पर्यावरणातील बदलाने जगण्या-मरण्याचा संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:25 AM2021-09-13T04:25:47+5:302021-09-13T04:25:47+5:30
देवराष्ट्रे (ता. कडेगांव) येथील यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यात अमृतवेल ग्रामविकास प्रबोधिनी, खानापूर-कडेगाव साहित्य परिषद आणि वृक्षमित्र धों. म. ...
देवराष्ट्रे (ता. कडेगांव) येथील यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यात अमृतवेल ग्रामविकास प्रबोधिनी, खानापूर-कडेगाव साहित्य परिषद आणि वृक्षमित्र धों. म. मोहिते चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित पर्यावरण पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी संपतराव पवार यांची प्रमुख उपस्थिती हाेती. यावेळी वृक्षमित्र धों. म. मोहिते पर्यावरण पत्रकार पुरस्काराने सातारा येथील पत्रकार शैलेंद्र पाटील यांना तर कविवर्य चंद्रकांत देशमुख पर्यावरणस्नेही पुरस्काराने अजित ऊर्फ पाप्पा पाटील यांना सन्मानित केले.
संपतराव पवार म्हणाले, पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. हे जरी खरे असले तरी पर्यावरण समतोलाच्या मुळाशी विकासनीतीशी संबंध आहे. रघुराज मेटकरी यांनी स्वागत केले. धर्मेंद्र पवार यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी प्रा. संजय ठिगळे, सुवर्णा ठिगळे यांचा सत्कार करण्यात आला. नियोजित कविवर्य चंद्रकांत देशमुखे साहित्य अकादमीच्या बाेधचिन्हाचे अनावरण संपतराव पवार, अजित पाटील यांच्या हस्ते झाले.
प्रा. विश्वनाथ गायकवाड, रानकवी सु. धों. मोहिते, प्रा. संजय ठिगळे, अनुपमा एन. व्ही. यांनी मनोगत व्यक्त केले.
दत्तात्रय सपकाळ, शांतिनाथ मांगले यांनी मानपत्राचे वाचन केले. दीपक पवार यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास ज्येष्ठ नेते बी. टी. महिंद, प्रा. श्रीकृष्ण मोहिते, राजाराम गरुड, सुरेश यादव, अरुण लंगोटे, अभिजित पाटील, इंद्रजित पाटील, प्रगती पाटील, डॉ. स्वाती शिंदे-पवार, प्रदीप सुतार, यांच्यासह पर्यावरणस्नेही तसेच वन कर्मचारी उपस्थित होते. एम. बी. जमादार यांनी आभार मानले.
चौकट
पुरस्काराची रक्कम चंद्रकांत देशमुखे साहित्य अकादमीला
कविवर्य चंद्रकांत देशमुखे पर्यावरण स्नेही पुरस्काराने अजित पाटील (सांगली) यांना सन्मानित केले. पाटील यांनी पुरस्काराची रक्कम नियोजित कविवर्य चंद्रकांत देशमुखे साहित्य अकादमीकडे सुपूर्द केली.
फोटो : १२ देवराष्ट्रे १
ओळी : देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील वृक्षमित्र धों. म. मोहिते पर्यावरण पत्रकार पुरस्कार शैलेंद्र पाटील व कविवर्य चंद्रकांत देशमुखे पर्यावरणस्नेही पुरस्कार अजित पाटील यांना देण्यात आला. यावेळी संपतराव पवार, सु. धों. मोहिते, विश्वनाथ गायकवाड, रघुराज मेटकरी, धर्मेंद्र पवार उपस्थित हाेते.