संघर्षयाेद्धा, युवा नायक अनिल (शेठ) पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:26 AM2021-07-31T04:26:29+5:302021-07-31T04:26:29+5:30
आटपाडी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला व तळागाळातील युवकांना जिवाभावाचा आधार देणारा युवा नायक म्हणजे अनिल (शेठ) पाटील. ते तालुक्यात रात्रंदिवस ...
आटपाडी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला व तळागाळातील युवकांना जिवाभावाचा आधार देणारा युवा नायक म्हणजे अनिल (शेठ) पाटील. ते तालुक्यात रात्रंदिवस सामाजिक कार्यासाठी झगडत आहेत. आपल्या अनोख्या कार्यपद्धतीमुळे हा युवा नायक तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. अत्यंत हळव्या मनाचा, तितकाच तत्त्वांशी ठाम असलेला 'दुसरा कोणी न होणे' असे अस्तित्व निर्माण केले आहे. अशा या अवलियाचा आज वाढदिवस! त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा व जीवनशैलीचा घेतलेला आढावा...
युवा नायक अनिल (शेठ) पाटील यांचा जन्म सर्वसामान्य कुटुंबात झाला. ‘संघर्ष' हा त्यांच्या जीवनाचा पाया होता. त्यांनी परिस्थितीशी दोन हात करताना व आपला ध्येयमार्ग स्वीकारताना अनेक चढ-उतार पार केले. आपले उदरनिर्वाहाचे साधन निश्चित करताना त्यांनी नकळतपणे सामाजिक कार्यात प्रवेश केला. तळागाळातील, गोरगरीब जनतेचे प्रश्न समाेर येऊ लागल्यानंतर ते साेडविण्यासाठी अनिलशेठ जिवाचे रान करू लागले.
युवकांपुढे असणाऱ्या अनेक समस्या पाहून त्यांचे काळीज हलू लागले. हाताला काम नसलेले युवक, त्यांचे ध्येयहीन जीवन पाहून अनिलशेठ त्यांनी त्यांच्यासाठी काम करण्याचे ठरविले. युवकांच्या अंध:कारमय जीवनात प्रकाश आणणे हेच आपले ध्येय त्यांनी निश्चित केले.
दुष्काळाने तालुक्यातील लोकांची परिस्थिती बिकट झाली आहे. अतिवृष्टीने कर्जबाजारी लोकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पावसाळ्यात गोरगरिबांच्या घरांची पडझड झाली आहे. या सर्व लोकांना त्यांनी मानसिक आधार देऊन आपल्या परीने आर्थिक मदत केली. घराची पडझड झालेल्या लोकांना सावली निर्माण करून दिली. पीक-पाण्याचे नुकसान झालेल्या कुटुंबांना शासकीय मदत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
कोरोना महामारीच्या काळात त्यांनी निराधार-निराश्रीत़ांना आधार दिला. परगावाहून आलेली कुटुंबे तसेच मोलमजुरी करणारी गरजू, गरीब कुटुंबे यांना अन्नधान्य, किराणा देऊन दररोजची चूल चालू ठेवली.
विविध सामाजिक कार्यांबरोबरच त्यांनी लोकांची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी, त्यांची गरज ओळखून पावले टाकली. उद्योगनिर्मिती, पतपुरवठा व पतसंरक्षण यासाठी संस्थात्मक कार्य उभा केले.
सध्या ते विविध सामाजिक कार्यासाठी रात्रंदिवस काम करत आहेत. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे युवकांची फौज त्यांच्यासोबत कार्यरत आहे. गोरगरिबांना दिलेला आधार, युवक कल्याणासाठी केलेले कार्य, समाजकार्यासाठी असणारी तळमळ यामधून ते आटपाडी तालुक्यातील लोकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.
आज त्यांचा वाढदिवस साजरा करताना अनेक हितचिंतकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्यांच्या भविष्यकालीन दमदार, दिमाखदार व देदीप्यमान सामाजिक कार्यास लाख-लाख शुभेच्छा!