इस्लामपुरात विद्यार्थी राष्ट्रवादीचा इंधन दरवाढी विरोधात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:30 AM2021-08-12T04:30:21+5:302021-08-12T04:30:21+5:30

इस्लामपूर येथे विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने इंधन दरवाढीविरुद्ध अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रतीक नायकल, अनुज कोळेकर, विनायक बेडके, ऋषिकेश ...

Student NCP protests against fuel price hike in Islampur | इस्लामपुरात विद्यार्थी राष्ट्रवादीचा इंधन दरवाढी विरोधात मोर्चा

इस्लामपुरात विद्यार्थी राष्ट्रवादीचा इंधन दरवाढी विरोधात मोर्चा

Next

इस्लामपूर येथे विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने इंधन दरवाढीविरुद्ध अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रतीक नायकल, अनुज कोळेकर, विनायक बेडके, ऋषिकेश पाटील उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : वाळवा तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस दरवाढीविरोधात निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. यावेळी हातगाड्यावर दुचाकी ठेवून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष राजकेदार आटुगडे म्हणाले, केंद्र सरकार वारंवार करत असलेले इंधन दरवाढ तसेच खाद्यतेलाच्या व गॅस किमतीमध्ये भरमसाट वाढ झाली आहे. एका बाजूने मोफत लसीकरणाची जाहिरातबाजी सुरू आहे आणि पेट्रोल व डिझेलच्या किमती वाढवून जनतेला लुटण्याचे काम हे मोदी सरकार करत आहे.

उपाध्यक्ष सुशांत कुराडे म्हणाले, देशात गेली सात वर्षे झाली मोदी सरकार आहे, सरकार आल्यापासून सामान्य जनतेला असह्य केले जात आहे. ७० रुपये लिटर असणारे पेट्रोल १०७ रुपये झाले आहे. अन्नधान्य पिकवणारा शेतकरी अडचणीत आहे. संसार चालवणारा सामान्य नागरिक अडचणीत आहे. आता २ रुपयेने पेट्रोल वाढले तर आक्रोश करणारे भाजपचे नेते कुठे आहेत.

यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रतीक नायकल, अनुज कोळेकर, विनायक बेडके, ऋषिकेश पाटील, अनिरुद्ध पाटील, सुजित कणप, शुभम माळी, अमन मुल्ला, सुहास पाटील, धनंजय जाधव, स्वप्निल शेळके, श्रेयश कदम, अतुल पाटील, युवती संघटनेच्या दर्शना पाटील, शितल खिलारे, सायली झेंडे, ऐश्वर्या चव्हाण, वैष्णवी चव्हाण उपस्थित होते.

Web Title: Student NCP protests against fuel price hike in Islampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.