नववर्षाच्या स्वागतास कर्मवीर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनुभवले आकाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:25 AM2021-01-08T05:25:20+5:302021-01-08T05:25:20+5:30
शुक्रवारी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने मुलांच्या चिकित्सक, जिज्ञासू वृत्तीला वाव मिळावा व पुस्तकापलीकडे जाऊन विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा, या हेतूने ...
शुक्रवारी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने मुलांच्या चिकित्सक, जिज्ञासू वृत्तीला वाव मिळावा व पुस्तकापलीकडे जाऊन विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा, या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मिथुन राशीतील उल्कावर्षाव आणि आकाशातील ग्रह-ताऱ्यांचे दुर्बिणीतून अवकाश समजून देण्यात आले. मुलांनी रात्री चंद्र, नक्षत्र, कृतिकेचा तारकापुंज आदी ग्रहतारे समजून घेतले. शशिकांत सुतार, संजय गलगले यांनी माहिती सांगितली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षण क्षमता, जिज्ञासा वृत्ती वाढेल, असा विश्वास मुख्याध्यापिका शुभांगी जगताप यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे संयोजन विज्ञान विभागप्रमुख हुसेन मगदूम यांनी केले. यावेळी शिक्षिका कीर्ती सोहनी, धुळा इरकर, ज्योती नागने व विद्यार्थी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून हा उपक्रम राबवण्यात आला.
फाेटाे : ०५ ग्राम २