विद्यार्थी, पालकांची आर्थिक लूट थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:19 AM2021-06-25T04:19:21+5:302021-06-25T04:19:21+5:30
इस्लामपूर येथे शिक्षणविस्तार अधिकारी छाया माळी यांना सागर मलगुंडे, शकील सय्यद यांनी निवेदन दिले. यावेळी सतीश पाटील, सुभाष जाधव, ...
इस्लामपूर येथे शिक्षणविस्तार अधिकारी छाया माळी यांना सागर मलगुंडे, शकील सय्यद यांनी निवेदन दिले. यावेळी सतीश पाटील, सुभाष जाधव, रोहित नाझरे, दीपक पाटील उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील अनेक शिक्षण संस्था या कोरोना महामारीच्या काळातही शालेय उपक्रम आणि देणगीच्या नावाखाली पालकांची लूट करीत आहेत. प्रशासनाने यामध्ये वेळीच हस्तक्षेप करून ही लूूट थांबवावी, अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख सागर मलगुंडे यांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन पंचायत समितीमधील शिक्षणविस्तार अधिकारी छाया माळी यांना देण्यात आले. कोरोना महामारीमुळे सध्या शाळेतील अध्यापनाचे काम बंंद आहे. ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकविले जात आहे. काही विद्यार्थी मोबाईल नसल्यामुळे या ऑनलाईन शिक्षणापासून वंचित आहेत. मात्र तरीही अनुदानित व विनाअनुदानित शिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या पालकांना निकाल, पुस्तके आणि नवीन प्रवेशाच्या नावाखाली अवास्तव फीची मागणी करीत आहेत. प्रशासनाने हे प्रकार न थांबविल्यास अवास्तव पैशांची मागणी करणाऱ्या शिक्षणसंस्थांची मान्यता रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दाद मागू, असा इशारा मलगुंडे यांनी दिला आहे.
यावेळी शहरप्रमुख नगरसेवक शकील सय्यद, संघटक सतीश पाटील, सुुभाष जाधव, दीपक पाटील, अतुल सूर्यवंशी, रोहित नाझरे, अनंत नाईक, योगेश हुबाले, प्रीतम काळे, आशिष कुकडे, सुहास पेटकर उपस्थित होते.