ग्राहक कायद्याचा अभ्यास करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:25 AM2021-03-06T04:25:24+5:302021-03-06T04:25:24+5:30
तासगाव : ग्राहक हा राजा असतो. कोणत्याही उत्पादकाकडून आपली फसवणूक होऊ नये, यासाठी ग्राहकांचे हित जोपासणारे कायदे निर्माण ...
तासगाव : ग्राहक हा राजा असतो. कोणत्याही उत्पादकाकडून आपली फसवणूक होऊ नये, यासाठी ग्राहकांचे हित जोपासणारे कायदे निर्माण झाले आहेत. त्या ग्राहक कायद्यांचा अभ्यास करा, असा सल्ला न्यायाधीश मुकुंद दात्ये यांनी दिला.
तासगाव येथील पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे हे अध्यक्षस्थानी होते. महाविद्यालयातील वाणिज्य विभाग, आय. क्यू. ए. सी. आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत, तासगाव तालुका यांच्यावतीने या राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन केले होते.
दात्ये म्हणाले की, ग्राहक कायद्याविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे. विशेषत: तरुणांनी यासाठी पुढे यावे. ग्राहकाला कोणत्याही परिस्थितीत न्याय मिळाला पाहिजे, न्याय लवकर मिळावा यासाठी ग्राहक न्यायालय प्रयत्न करत आहे. ग्राहक न्यायालयाची भाषा मराठी आहे. येथे वकिलाची गरज नसते. छोटी तक्रारसुद्धा सहज आपल्याला करता येते.
प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांनीही मार्गदर्शन केले. प्रा. एम. डी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. कविता कांबळे यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. अमोल सोनवले यांनी आभार मानले. यावेळी सर्जेराव सूर्यवंशी, डॉ. एस. एस. पाटील, डॉ. अर्जुन वाघ, प्रा. आण्णासाहेब बागल, प्रा. एन. ए. कुलकर्णी, प्रा. जी. आर. पाटील, प्रा. स्वप्नील पाटील, एम. बी. कदम उपस्थित होते.