शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरलाच व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:30 AM2021-07-14T04:30:34+5:302021-07-14T04:30:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरलाच व्हावे, या मागणीचे निवेदन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरलाच व्हावे, या मागणीचे निवेदन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांना देण्यात आल्याची माहिती किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ. उमेश देशमुख यांनी दिली.
देशमुख म्हणाले, सांगली जिल्ह्यात शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र २०१३मध्ये मंजूर केले आहे. त्याची प्रक्रियाही सुरु झाली आहे. यासाठी समितीने काही जागा पाहिल्या होत्या. त्यातील खानापूर व पेडची जागा आरक्षित करण्यासंदर्भात २०१६मध्ये विद्यापीठ प्रशासनाने सांगली जिल्हाधिकारी यांना कळविले आहे. पण त्यानंतर काहीच झाले नाही. पुढे समिती बदलली. पण त्यानंतर कोरोना साथ सुरु झाली. त्यामुळे या समितीला फारसे काही करता आले नाही. त्यातच काही दिवसांपूर्वी शिक्षणमंत्र्यांनी बस्तवडे (ता. तासगाव) येथील जागेला तत्वत: मान्यता दिल्याचे जाहीर केले आणि त्याची चर्चा परत सुरु झाली. विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर परिसरात झाले पाहिजे, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे.
यावेळी कॉ. डॉ. उदय नारकर, कॉ. गोपीनाथ सूर्यवंशी, अक्षय भगत, ऋषिकेश देसाई, जालिंदर पवार-पाटील आदी उपस्थित होते.