पावसामुळे उपनगरातील रस्ते चिखलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:19 AM2021-06-17T04:19:24+5:302021-06-17T04:19:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गेल्या दोन दिवसांच्या पावसामुळे महापालिका क्षेत्रातील उपनगरे, विस्तारित भागाची दैना उडाली आहे. ड्रेनेजच्या कामासाठी ...

Suburban roads muddy due to rains | पावसामुळे उपनगरातील रस्ते चिखलात

पावसामुळे उपनगरातील रस्ते चिखलात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : गेल्या दोन दिवसांच्या पावसामुळे महापालिका क्षेत्रातील उपनगरे, विस्तारित भागाची दैना उडाली आहे. ड्रेनेजच्या कामासाठी खुदाई केलेले रस्ते चिखलात रूतले आहे. अनेक मोकळ्या प्लाॅटमध्ये पाणी साचले आहे. गुंठेवारी भागातील नागरिकांच्या मरणयातना अजूनही कायम आहेत.

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने जोर धरला आहे. गेल्या दोन दिवसांत शहर परिसरात संततधार सुरू आहे. या पावसामुळे शहरातील शंभर फुटी, शामरावनगर, आप्पासाहेब पाटील नगरसह अनेक उपनगरांत पाणी साचले आहे. गुंठेवारी भागात मोठ्या प्रमाणात मोकळे प्लाॅट आहेत. या प्लाॅटमध्ये दरवेळी पाणी साचते. या पाण्याचा निचरा करणारी व्यवस्थाच आजअखेर उभी राहिलेली नाही. शामरावनगर परिसरात ड्रेनेजचे काम आठ वर्षांपासून सुरू आहे. त्यासाठी अनेकदा रस्ते खोदले जात आहेत. आप्पासाहेब पाटील नगर परिसरात सध्या ड्रेनेजचे काम सुरू आहे. त्यासाठी रस्त्याची खुदाई करण्यात आली आहे. त्यात पाऊस झाल्याने रस्ते चिखलात रूतले आहेत. या चिखलातूनच नागरिकांना वाट शोधावी लागत आहेत. दरवर्षी पावसाळी मुरूमाची मागणी होते. पण हा मुरूमही मातीतच जातो. यंदाही मुरूमासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. काही भागांत मुरूम टाकण्यात आला पण अजूनही बरासा भागात पावसाळी मुरूम पोहोचलेला नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच उपनगरांतील नागरिकांची दैना उडाली आहे.

चौकट

चिखलाचे साम्राज्य : साखळकर

आप्पासाहेब पाटील नगर भागात ड्रेनेजचे काम सुरू असून त्या ठिकाणी टाकल्या जाणाऱ्या पाईप लहान आकाराच्या आहेत. आता पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे त्या भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यासाठी महापालिकेने तातडीने उपाययोजना करावी, तसेच ड्रेनेज कामाचीही चौकशी करावी, अशी मागणी नागरिक जागृती मंचाचे जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर यांनी केली.

Web Title: Suburban roads muddy due to rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.