राजारामबापू फार्मसीच्या १३ विद्यार्थ्यांचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:25 AM2021-04-17T04:25:46+5:302021-04-17T04:25:46+5:30
इस्लामपूर : कासेगाव (ता. वाळवा) येथील राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसीमधील १३ विद्यार्थ्यांनी एम. फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर घेतल्या ...
इस्लामपूर : कासेगाव (ता. वाळवा) येथील राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसीमधील १३ विद्यार्थ्यांनी एम. फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या जीपॅट परीक्षेत उज्ज्वल यश मिळविले.
प्राचार्य डॉ. सी. एस. मगदूम म्हणाले, कासेगावसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थी जास्त संख्येने शिक्षण घेत आहेत. त्यांना औषध निर्माण शास्त्र विषयाच्या परिपूर्ण ज्ञानाबरोबरच विविध स्पर्धा परीक्षा आणि नोकरीविषयक मार्गदर्शन करण्यासाठी महाविद्यालय कटिबद्ध आहे.
सुशांत पाटील, ऐश्वर्या शिंदे, नेहा मुरकर, हर्षदा गायकवाड, अंकिता पाटील, कल्याणी मोहिते, ओंकार मोहिते, सोनल वीर, तृप्ती घोडके, प्रमित कोकाटे, किरण कचरे या विद्यार्थ्यांनी हे यश मिळविलेले आहे. कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य आर. डी. सावंत, सहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र कुरळपकर, प्राचार्य डॉ. सी. एस. मगदूम, प्राचार्य डॉ. एस. के. मोहिते यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.