विद्यार्थ्यांनी ध्येय ठरविल्यास यश निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:24 AM2021-03-19T04:24:52+5:302021-03-19T04:24:52+5:30
फोटो ओळ : उमदी (ता. जत) येथे सर्वोदय करियर ॲकॅडमीतर्फे नामदेव दांडगे यांच्याहस्ते विद्यार्थ्यांना ट्रँकसुट वाटप करण्यात आले. यावेळी ...
फोटो ओळ : उमदी (ता. जत) येथे सर्वोदय करियर ॲकॅडमीतर्फे नामदेव दांडगे यांच्याहस्ते विद्यार्थ्यांना ट्रँकसुट वाटप करण्यात आले. यावेळी रेवाप्पाण्णा लोणी उपस्थित होते.
उमदी : विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून त्या दिशेने वाटचाल केल्यास नक्कीच यश प्राप्त होते. जिद्दीने प्रयत्न केल्यास आपण कठीण परिस्थितीवरही मात करू शकतो ,असे मत उमदीचे पोलीस उप-निरीक्षक नामदेव दांडगे यांनी व्यक्त केले.
उमदी (ता. जत) येथे सर्वोदय करियर ॲकॅडमीच्या वतीने विद्यार्थ्यांना ट्रँकशुट वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. सर्वोदय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष रेवाप्पाण्णा लोणी अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर उपस्थित होत्या.
रेश्माक्का होर्तीकर म्हणाल्या की, उमदी सारख्या ग्रामीण भागात ॲकॅडमी सुरू झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना सराव व अभ्यास करण्यासाठी चांगली सोय निर्माण झाली आहे. जास्तीत जास्त मुलींनी देखील याचा लाभ घ्यावा असे आव्हान त्यांनी केले.
यावेळी आमगोंडा पाटील, उपप्राचार्य डी. सी. बासरगाव, उप-मुख्याध्यापक एस. सी. जमादार, मल्लिकार्जुन मेडींगिरी, लिंगाप्पा लोणी, प्रा. गणेश शेवाळे, प्रा. सविता चव्हाण, श्रीशैव वळसंग आदी उपस्थित होते. प्राचार्य एस.के. होर्तीकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. घन:श्याम चौगुले यांनी सुत्रसंचालन केले. एम. बी. पुजेरी यांनी आभार मानले.