'मॉडर्न'च्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:25 AM2021-03-06T04:25:02+5:302021-03-06T04:25:02+5:30
विटा : शासनमान्य शिष्यवृत्ती व टीईएस परीक्षेत विटा येथील मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या चिंतामणी कोंडोपंत गुळवणी शैक्षणिक संकुलातील बिंदूताई महामुनी ...
विटा : शासनमान्य शिष्यवृत्ती व टीईएस परीक्षेत विटा येथील मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या चिंतामणी कोंडोपंत गुळवणी शैक्षणिक संकुलातील बिंदूताई महामुनी शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
इयत्ता पाचवीतील महमदसैफ सादिक मोमीन व महमदकैफ सादिक मोमीन या सख्या भावांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. या शाळेतील केतकी विजय घाडगे व सोहम अनिल कोष्टी या दोघांनी शिष्यवृत्ती परीक्षेत केंद्रात चौथा क्रमांक पटकाविला तर अनुष्का किरण चव्हाण हिने ६ वा, आर्यन नागनाथ तामखडे याने केंद्रात दहावा तर श्रेया आनंद देशमुख व आदर्श सुभाष सुतार या दोघांनी केंद्रात १४ वा क्रमांक पटकाविला तर दिव्या आनंद माने या पहिलीच्या विद्यार्थिनीने केंद्रात चौथा क्रमांक पटकाविला.
या विद्यार्थ्यांना शिक्षक संतोष मोहिते, अरुण कांबळे, मनिषा तामखडे यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच टीईएस परीक्षेत शौर्य मदन वरूडे याने केंद्रात १४ वा क्रमांक मिळविला. शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत यश मिळविलेल्या महमद सैफ व महमद कैफ या बंधूंना रेखा मेटकरी, अविनाश क्षीरसागर यांनी सायकल भेट दिली. या दोघांना वैशाली शेटे, रेखा मेटकरी, विजय लोहार, अविनाश क्षीरसागर, संगिता शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष विनोद गुळवणी, सचिव डॉ. मेघा गुळवणी, मुख्याध्यापक डी. पी. कुलकर्णी, व्ही. एस. शेटे यांनी अभिनंदन केले.