नानासाहेब महाडिक पॉलिटेक्निकचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:26 AM2021-04-22T04:26:45+5:302021-04-22T04:26:45+5:30
इस्लामपूर : श्री वेंकटेश्वरा शिक्षण संस्था पेठ संचालित नानासाहेब महाडिक पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील ...
इस्लामपूर : श्री वेंकटेश्वरा शिक्षण संस्था पेठ संचालित नानासाहेब महाडिक पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडून घेण्यात आलेल्या डिप्लोमा इंजिनियरिंग अभ्यासक्रमाच्या हिवाळी परीक्षेमध्ये उत्तुंग यश संपादन केले आहे. महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे.
तृतीय वर्षातील सिव्हिल विभागात प्रज्ञा पाटील हिने ९६.४० टक्के तसेच द्वितीय वर्षातील मेकॅनिकल विभागाच्या सानिका सपकाळ हिने ९५.३७ टक्के तसेच प्रथम वर्षातील प्रथमेश जोशी याने ९७.४३ टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला, अशी माहिती प्राचार्य महेश जोशी यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘कोरोनाच्या कठीण परिस्थितीतदेखील महाडिक पॉलिटेक्निकने उत्कृष्ट निकालाची परंपरा जपली आहे. त्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्रयत्नशील असतात. विद्यार्थी हे तंत्रज्ञानाबरोबरच कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सातत्याने चमकत आहेत.’’
चाैकट
गुणानुक्रमे प्रथम तीन क्रमांक
सिव्हिल विभाग : प्रथम : क्रमांक प्रज्ञा पाटील ९६.४० टक्के, द्वितीय : रोहन पाटील ९५.७०, तृतीय : विनय कुंभार ८७.४०. इलेक्ट्रॉनिक विभाग : प्रथम : निहाल ९२.७४, द्वितीय : प्रतीक पाटील ९२.३२, तृतीय : अल्फिया इबुशे ९०.४२, कॉम्प्युटर विभाग : प्रथम : पियुषा उरुणकर ९४.६७, द्वितीय : अमेय रत्नपारखी व मोनिका चव्हाण ९४.३३, तृतीय : चेतन केसरे ९४.२२. इलेक्ट्रिकल विभाग : प्रथम : सानिका पाटील ९५.३०, द्वितीय : संकेत वीरभक्त ९३.६०, तृतीय : इशा पाटील ९०.५०. मेकॅनिकल विभाग : प्रथम : संग्राम चव्हाण ९२.८६, द्वितीय : ऋतुजा कदम ९१.२४, तृतीय : अनिकेत रकटे ९०.१०