आरआयटीच्या विद्यार्थ्यांचे युवा महोत्सवात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:19 AM2021-07-20T04:19:53+5:302021-07-20T04:19:53+5:30
इस्लामपूर : अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये दर्जेदार शिक्षण देणाऱ्या राजारामनगर येथील राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या जिल्हा व मध्यवर्ती ...
इस्लामपूर : अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये दर्जेदार शिक्षण देणाऱ्या राजारामनगर येथील राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या जिल्हा व मध्यवर्ती ऑनलाईन युवा महोत्सवात यश संपादन केले. आरआयटीच्या सांस्कृतिक आविष्काराची पताका या विद्यार्थ्यांनी फडकाविली.
विनय महाडिक याने एकपात्री प्रयोगात तर अनिकेत आगावणे याने मिमिक्रीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. साक्षी चौगुले हिने मराठी वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला. सुनंदा धनवडे हिने व्यंगचित्रामध्ये जिल्ह्यात दुसरा तर मध्यवर्ती पातळीवर तृतीय क्रमांक पटकाविला. साक्षी हेब्बाळकरने सुगम गायनात द्वितीय क्रमांक मिळविला. इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत शुभम बाबर तृतीय आला. आरआयटीच्या सांस्कृतिक कक्षाचे मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभले. संचालिका डॉ. सुषमा कुलकर्णी, डॉ. एल. एम. जुगुलकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. एस. एस. पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.