वाटेगाव-सुरुल शाखेची यशस्वी वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:28 AM2021-04-23T04:28:25+5:302021-04-23T04:28:25+5:30
वाटेगाव-सुरुल शाखा कार्यस्थळावर चीफ केमिस्ट संभाजी सावंत यांचा संचालक दिलीपराव पाटील यांनी सत्कार केला. यावेळी आनंदराव पाटील, देवराज पाटील, ...
वाटेगाव-सुरुल शाखा कार्यस्थळावर चीफ केमिस्ट संभाजी सावंत यांचा संचालक दिलीपराव पाटील यांनी सत्कार केला. यावेळी आनंदराव पाटील, देवराज पाटील, आर. डी. माहुली, प्रशांत पाटील, संताजी चव्हाण, आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून १८-१९ वर्षांपूर्वी उभा राहिलेल्या, देशातील पहिली शाखा ठरलेल्या वाटेगाव-सुरुल शाखेने यशस्वी वाटचाल कायम ठेवल्याचे गौरवोद्गार राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक आनंदराव पाटील यांनी काढले.
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वाटेगाव-सुरुल शाखेच्या सांगता समारंभात ते बोलत होते. प्रारंभी राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संचालक देवराज पाटील, संचालक दिलीपराव पाटील, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील उपस्थित होते.
आनंदराव पाटील म्हणाले, वाटेगाव- सुरुल शाखेत १३८ दिवसांत ५ लाख २३ हजार ९५७ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ६ लाख ४८ हजार १०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतलेले आहे. येथे सरासरी साखर उतारा १२.७३ इतका मिळाला आहे. या युनिटमध्ये १ कोटी ८५ लाख ५ हजार ५३ युनिट वीज निर्मिती केली आहे.
यावेळी हा गळीत हंगाम यशस्वी करण्यात मोलाचे योगदान केल्याबद्दल चीफ इंजिनिअर संताजी चव्हाण, चीफ केमिस्ट संभाजी सावंत यांचा सत्कार करण्यात आला. कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संताजी चव्हाण यांनी आभार मानले. यावेळी मोहन पाटील, शिवाजी चव्हाण, कुमार पाटील, ए. डी. पाटील, पी. एस. पाटील, संजय पाटील, विजय पाटील उपस्थित होते.