सामुदायिक परिश्रमातून हंगाम यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:27 AM2021-04-21T04:27:02+5:302021-04-21T04:27:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी कोरोनाच्या संकटाला सामोरे जात सामुदायिक परिश्रमातून हा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी कोरोनाच्या संकटाला सामोरे जात सामुदायिक परिश्रमातून हा गळीत हंगाम पार पाडला असल्याची भावना राजारामबापू कारखान्याचे संचालक, बहेचे माजी सरपंच विठ्ठलतात्या पाटील यांनी व्यक्त केली.
साखराळे येथे राजारामबापू कारखान्याच्या गळीत हंगामाच्या सांगता कार्यक्रमात ते बोलत होते. हंगाम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व घटकांचा सत्कार करण्यात आला. संचालक पै. भगवान पाटील, कार्तिक पाटील, जालिंदर कांबळे, सुवर्णा पाटील, जनरल मॅनेजर एस. डी. कोरडे उपस्थित होते.
पाटील म्हणाले, ‘‘साखराळे युनिटमध्ये १४१ दिवसात ९ लाख ४७ हजार ९८ टन उसाचे गाळप केले आहे. ११ लाख २९ हजार ९०० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. येथे १२.७७ साखर उतारा मिळाला आहे.’’
एस. डी. कोरडे, विजय मोरे, प्रशांत पाटील, जयंत निबंधे, सुनील सावंत यांच्यासह हंगाम पूर्ण करण्यात योगदान केलेल्या सर्वांचा प्रातिनिधिक सत्कार केला.
कामगार नेते शंकरराव भोसले, राजेंद्र चव्हाण, प्रेमनाथ कमलाकर, सुजय पाटील, सुनील जाधव, महेश पाटील उपस्थित होते. तानाजीराव खराडे यांनी आभार मानले.