सोना क्लिनिकमध्ये पॅरॅलिसिस पेशंटवर यशस्वी उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:20 AM2021-06-05T04:20:59+5:302021-06-05T04:20:59+5:30
फोटो-०४अश्विनीकुमार पाटील सांंगली : सोना क्लिनिक व हॉस्पिटल सांगली येथे पॅरॅलिसिस पेशंटवर ॲन्जिओप्लास्टी स्पॉयलिंगद्वारे वेळेत उपचार करून पेशंट पूर्ण ...
फोटो-०४अश्विनीकुमार पाटील
सांंगली : सोना क्लिनिक व हॉस्पिटल सांगली येथे पॅरॅलिसिस पेशंटवर ॲन्जिओप्लास्टी स्पॉयलिंगद्वारे वेळेत उपचार करून पेशंट पूर्ण बरा केला असल्याची माहिती न्यूरोलॉजिस्ट व स्ट्रोकस्पेशालिस्ट डॉ. अश्विनीकुमार पाटील यांनी दिली.
ते म्हणाले, कोरोनामुळे संचारबंदी आहे. या संकटात जीव धोक्यात असणाऱ्या पेशंटवर सोना क्लिनिक व हॉस्पिटलमध्ये पॅरलिसीस व व्यसनमुक्ती सेंटरमध्ये वेळेत उपचार केले जात आहेत. मेंदूला रक्तपुरवठा खंडित झाल्याने किंवा मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्याने पॅरॅलिसीस होतो. तसेच मेंदू व मानेतील रक्तवाहिनी बारीक होणे हे पॅरॅलिसिस होण्यासाठी एक महत्त्वाचे कारण असते. अशा पेशंटवर वेळेत उपचार झाले नाहीत तर कायमचे अपंगत्व येऊ शकते. त्यांनी सुरेखा राजागाेंडा पाटील (ब्रह्मनाळ) व रमेश शिवाजी नागरगोजे यांची तपासणी केली असता डोकेदुखी, उलटी होत असून एकाची रक्तवाहिनी फुटली होती; तर एकाची रक्तवाहिनी बंद पडली होती. त्यामुळे पॅरॅलिसिस झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्यावर ॲन्जिओप्लास्टीमधून स्पॉयलिंगद्वारे फुटलेली रक्तवाहिनी बंद केली व दुसऱ्या पेशंटची बंद झालेली रक्तवाहिनी ॲन्जिओप्लास्टी करून सुरू केले. त्यामुळे इंजेक्शनद्वारे पॅरॅलिसीचे पेशंट चार दिवसांत बरे झाले आहेत.
त्यांना डॉ. सुरेश पाटील, डॉ. रवींद्र पाटील, डॉ. नंदकुमार पाटील यांचे सहकार्य लाभले. या वेळी डॉ. अशोक देशमाने, डॉ. पृथ्वी काळाेखे, डाॅ. स्वाती पाटील, गंगाधर आंबाेळे, रविकांत काशिद, संताेष कुंभार, संध्या शहा, अनिल यड्रावे, तानाजी माेकाशी, दत्तात्रय भगरे, रमेश आंबाेळे, शरद सातपुते उपस्थित हाेते.