जत : आत्महत्येच्या प्रयत्नात ‘ती’ वाचली, बाळाचा जीव गेला-: कौटुंबिक वाद; महिला रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:20 AM2018-12-26T00:20:06+5:302018-12-26T00:20:37+5:30

आसंगी-जत (ता. जत) येथील संगीता भानुदास गडदे (वय २२) या विवाहितेने आपल्या सव्वा महिन्याच्या बाळाला विहिरीच्या काठावर ठेवून, आपण विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ती गंभीर असून

As such, in the attempt of suicide, 'she read', the baby's life went away: Family Decree; Women Hospital | जत : आत्महत्येच्या प्रयत्नात ‘ती’ वाचली, बाळाचा जीव गेला-: कौटुंबिक वाद; महिला रुग्णालयात

जत : आत्महत्येच्या प्रयत्नात ‘ती’ वाचली, बाळाचा जीव गेला-: कौटुंबिक वाद; महिला रुग्णालयात

Next
ठळक मुद्देआसंगी-जतची घटना

जत : आसंगी-जत (ता. जत) येथील संगीता भानुदास गडदे (वय २२) या विवाहितेने आपल्या सव्वा महिन्याच्या बाळाला विहिरीच्या काठावर ठेवून, आपण विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ती गंभीर असून तिच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण या घटनेत तिच्या बाळाचा भुकेने व्याकुळ होऊन व थंडीमुळे मृत्यू झाला.

ही घटना मंगळवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली. याप्रकरणी आसंगी-जत ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीमंत रावसाहेब पाटील यांनी उमदी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
संगीता व भानुदास यांचा सुमारे अडीच वर्षापूर्वी विवाह झाला. भानुदास हा शेतमजूर आहे. संगीता ही कौटुंबिक वादातून काही दिवसांपासून माहेरी कोकळे (ता. कवठेमहांकाळ) येथे राहत होती. सोमवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्यादरम्यान ती सासरी आसंगी-जत येथे आली होती. कौटुंबिक वादातून भानुदास व संगीता यांच्यामध्ये मतभेद होते. मामाला बोलावून घेऊ व आपल्यातील मतभेद मिटवू, अशी सूचना भानुदास याने संगीताला सायंकाळी माहेरहून आसंगी-जत येथे आल्यानंतर केली होती.

संगीताचे मामा आसंगी-जत गावालगत शेतात राहतात. सोमवारी रात्री घरातील सर्वजण जेवण करून झोपल्यानंतर मंगळवारी पहाटेच्या सुमारास संगीता उठली व तिने गावालगत असलेल्या तुकाराम टोणे यांच्या विहिरीकडे जाऊन विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याआधी तिने बाळाला विहिरीच्या काठावर ठेवले होते. विहिरीत उडी घेतल्यानंतर, पाण्यातील विद्युत मोटारीच्या पाईपला धरून ती तशीच थांबली होती.
सकाळी साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान तुकाराम टोणे यांचा मुलगा अरुण हा विहिरीजवळ गेला असता, त्याला विहिरीच्या काठालगत मृतावस्थेत असलेले सव्वा महिन्याचे बाळ आढळून आले. त्यानंतर त्याने विहिरीत डोकावून पाहिले असता, संगीता ही पाईपला धरून थांबलेली दिसली. या घटनेची माहिती त्याने गावातील नागरिकांना दिली.

गावातील तरुणांनी वाचविले प्राण
काही तरुणांनी विहिरीत उतरून संगीताला बाहेर काढून उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले. सतत पाच-सहा तास थंड पाण्यात थांबल्यामुळे तिची प्रकृती गंभीर बनली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास उमदी पोलीस करत आहेत.

Web Title: As such, in the attempt of suicide, 'she read', the baby's life went away: Family Decree; Women Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.