कडकनाथ घोटाळ्याचा म्होरक्या सुधीर मोहितेची कार हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 12:37 AM2020-01-20T00:37:04+5:302020-01-20T00:37:11+5:30

इस्लामपूर : कडकनाथ कोंबडीपालन व्यवसायातून महाराष्ट्रासह परराज्यातील शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाºया रयत अ‍ॅग्रो इंडिया कंपनीचा सर्वेसर्वा सुधीर मोहिते ...

Sudhir Mohit's car seized by Kadaknath scam | कडकनाथ घोटाळ्याचा म्होरक्या सुधीर मोहितेची कार हस्तगत

कडकनाथ घोटाळ्याचा म्होरक्या सुधीर मोहितेची कार हस्तगत

Next

इस्लामपूर : कडकनाथ कोंबडीपालन व्यवसायातून महाराष्ट्रासह परराज्यातील शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाºया रयत अ‍ॅग्रो इंडिया कंपनीचा सर्वेसर्वा सुधीर मोहिते याची १ कोटी रुपये किमतीची महागडी आलिशान कार पाटण पोलिसांनी जप्त केली. इस्लामपूर पोलिसांनी यापूर्वीच संदीप मोहिते याच्याकडील आलिशान कार जप्त केली आहे.
पोलिसांच्या या कारवाईमुळे सुधीर मोहितेच्या आलिशान जगण्याची चर्चा परिसरात सुरु आहे. या कोट्यवधीच्या घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जात आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यासह सातारा जिल्ह्यातही शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल आहेत.
पाटण येथे दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी सुधीर मोहिते याची आलिशान कार जप्त करुन त्याला दणका दिला आहे. या कडकनाथ घोटाळ्यात राज्यातील शेतकºयांसह कर्नाटक, केरळ, तेलंगणा, छत्तीसगड या राज्यांतील शेतकºयांनाही गंडा घालण्यात आला आहे. या कडकनाथ घोटाळ्यात ८ हजाराहून अधिक शेतकºयांची ५00 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे.
कडकनाथप्रकरणी संचालक रडारवर!
सांगली : फलटण (जि. सातारा) येथील फूूड बर्ड अ‍ॅग्रो प्रायव्हेट कंपनीने कडकनाथ कोंबडी पालनातून जिल्ह्यातील १४० गुंतवणूकदारांना एक कोटी ५४ लाख ६६ हजारांच्या फसवणूक प्रकरणात तीन संशयितांना अटक केली असतानाच यातील अन्य संचालकही आता कारवाईच्या रडारवर आहेत. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे असून, फसवणूक झालेल्या १४० शेतकºयांचेही जबाब नोंदवून घेण्यात येत आहेत.
गुंतवणूकदारांकडून तक्रारी नाहीत
फूड बर्ड कंपनीकडून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची संख्या सध्या १४० सांगण्यात येत असली तरी त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी पुढे यावे. फसवणुकीबाबत तक्रार दाखल करावी, असे आवाहन केले आहे मात्र, आवाहनानंतरही अद्याप तक्रारी दाखल झालेल्या नाहीत.
कडकनाथ कोंबडीपालन घोटाळ्यातील प्रमुख संशयित सुधीर मोहिते याची आलिशान मोटार पाटण (जि. सातारा) येथे जप्त करण्यात आली.

Web Title: Sudhir Mohit's car seized by Kadaknath scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.