कवठेमहांकाळ तालुक्यात उसाला लागेना कोयता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:19 AM2020-12-27T04:19:23+5:302020-12-27T04:19:23+5:30

शिरढोण : कवठेमहांकाळ तालुक्यात ऊसक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. सध्या ऊसतोडी सुरू आहेत; पण उसाची मोठ्या प्रमाणात असलेली उपलब्धता, त्यात ...

Sugarcane is not harvested in Kavthemahankal taluka! | कवठेमहांकाळ तालुक्यात उसाला लागेना कोयता !

कवठेमहांकाळ तालुक्यात उसाला लागेना कोयता !

Next

शिरढोण : कवठेमहांकाळ तालुक्यात ऊसक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. सध्या ऊसतोडी सुरू आहेत; पण उसाची मोठ्या प्रमाणात असलेली उपलब्धता, त्यात मजुरांची कमी संख्या. यामुळे शेतकऱ्यांना त्या ऊसतोड टोळीच्या पाठीमागे लागावे लागत आहे. अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.

दरवर्षी तालुक्यात ऊसतोड मजुरांना जादा पैसे देऊन शेतकरी ऊस तोडून घेतात. सध्या त्याहीपेक्षा जादा पैसे देऊनही ऊसतोड मजूर मिळेनात अशी अवस्था आहे. अनेक वेळा शेतकऱ्यांवर ऊसतोड मजुरांना चक्क चिकन, मटण, मद्यपानासहित हजारो रुपये देऊन ऊसतोड करण्याची वेळ आली आहे.

ऊसतोडणीसाठी मोठ्या रकमा घेऊनही ऊसतोड मजूर फरार झाले आहेत. मजुरांअभावी शेतकरी अडचणीत सापडला असून कोरोनाचा फटका सध्याच्या ऊस हंगामालाही बसला आहे. ऊसतोड लांबत चालल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे कारखानदारांनी लक्ष देऊन कार्यक्षेत्रात नोंद असलेल्या ऊस योग्य वेळेत ऊस तोडण्याची जबाबदारी घेणे गरजेचे आहे.

चौकट

शेतकऱ्यांची लूट थांबवा

ऊसतोडणीसाठी शेतकऱ्यांकडून खाण्या-पिण्याची सोय मजूर करीत आहेत. वर जादा पैसेही घेत आहेत. यातून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. त्यामुळे कारखानदारांनी ही बाब गांभीर्याने घेत त्यावर नियंत्रण ठेवून शेतकऱ्यांची लूट थांबवावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

Web Title: Sugarcane is not harvested in Kavthemahankal taluka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.