मिरज पश्चिम भागात उसाला तुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:20 AM2020-12-07T04:20:24+5:302020-12-07T04:20:24+5:30

कसबे डिग्रज : मिरज पश्चिम भागात यावर्षीच्या गळीत हंगामासाठी सुमारे दहा हजार एकर क्षेत्रावर ऊस उपलब्ध आहे. अवकाळी पाऊस ...

Sugarcane stalks in the western part of Miraj | मिरज पश्चिम भागात उसाला तुरे

मिरज पश्चिम भागात उसाला तुरे

Next

कसबे डिग्रज : मिरज पश्चिम भागात यावर्षीच्या गळीत हंगामासाठी सुमारे दहा हजार एकर क्षेत्रावर ऊस उपलब्ध आहे. अवकाळी पाऊस व कोरोनामुळे यावेळी गळीत हंगाम उशिरा सुरू झाला. त्याचा विपरित परिणाम नवीन ऊस पिकांवर झाला आहे. परिसरात उसाला मोठ्या प्रमाणात तुरे आले आहेत. त्यामुळे उत्पादन घटण्याची चिन्हे आहेत.

मिरज पश्चिम भागात कृष्णाकाठच्या कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, तुंग, पद्माळे, त्याचप्रमाणे वारणा नदीकाठच्या समडोळी, कवठेपिरान, दुधगाव, सावळवाडी, माळवाडी आदी गावात यावर्षीच्या गळीत हंगामासाठी सुमारे सहा हजार एकर आडसाली आणि सुरू लागण, तर तीन हजार एकर खोडवा, त्याचप्रमाणे सुमारे हजारभर एकर निडवा असा दहा हजार एकर ऊस उपलब्ध आहे. गतवर्षी महापुराने बाकीची पिके घेता आली नव्हती. त्यामुळेच ऊस लागवड मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यामध्ये लवकर परिपक्व होणाऱ्या १०००१, ८०००५, को २६५, नीरा ८६०३२ या जातींची लागवड मोठ्या करण्यात आली होती. यावर्षी झालेला मोठा पाऊस, त्याचप्रमाणे कोरोना महामारीमुळे लांबलेला हंगाम, त्यातच साखर कारखान्यांना भेडसावणारी मजुरांची समस्या, यामुळेच ऊस तोडणी हंगाम लांबत आहे. त्यातच काही काळ ऊस दर आंदोलन झाले.

या सर्व अडचणींमुळे ऊस परिपक्व होऊनही तोडणी लांबणीवर पडत आहे. याचा विपरित परिणाम होतो आहे. उसाला तुरे आले आहेत. वजनात घट होत आहे. यासाठी तोडणी, वाहतूक यंत्रणा मोठ्या प्रमाणावर उभी करून ऊस तोडणी लवकर करावी, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकरी करीत आहेत.

फोटो : ०६ कसबे डिग्रज १

ओळ : मिरज पश्चिम भागात तुरे आलेला ऊस.

बातमी फोटो सह सविस्तर घेणे

Web Title: Sugarcane stalks in the western part of Miraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.