Sangli News: ऊस वाहतूक ट्रॅक्टरचा हुक तुटला, जीव वाचवायला उडी मारली अन् चाकाखाली सापडला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 12:32 PM2023-02-09T12:32:38+5:302023-02-09T12:33:26+5:30

चाक अंगावरून गेल्याने जागीच मृत्यू

Sugarcane transport tractor's hook broke, jumped to save life and found itself under the wheel in sangli | Sangli News: ऊस वाहतूक ट्रॅक्टरचा हुक तुटला, जीव वाचवायला उडी मारली अन् चाकाखाली सापडला

Sangli News: ऊस वाहतूक ट्रॅक्टरचा हुक तुटला, जीव वाचवायला उडी मारली अन् चाकाखाली सापडला

googlenewsNext

शिराळा : बिऊर (ता. शिराळा) येथील तलावाजवळ ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा हुक तुटल्यामुळे आपला जीव वाचविण्यासाठी चालत्या ट्रॅक्टरमधून उडी मारली असता ट्रॉलीच्या चाकाखाली सापडल्याने चालक ठार झाला. आकाश लहू खंडागळे ( वय २०, सद्य रा. आरळा, मुळगाव पुनंदगाव, ता. मादळगाव, जि. बीड) असे मृताचे नाव आहे. ही घटना बुधवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास घडली.

मयत आकाश, त्याचे वडील लहू खंडागळे, आई उषा, भाऊ सूरज यांचा ऊसतोड व ऊसवाहतूक व्यवसाय आहे. सध्या ते आरळा येथे राहण्यास आहेत. आरळा येथील गणपती भाष्टे यांच्या शेतातील ऊसतोड करून ट्रॅक्टरच्या (क्रमांक एम. एच. २३ बी ६२२८) दोन ट्रॉलीमध्ये ऊस भरून आकाश कारखान्याकडे निघाला होता.

ट्रॅक्टर बिऊर तलावाजवळ आला असता ट्रॉली व ट्रॅक्टरला जोडणारा हुक तुटला. यामुळे जीव वाचविण्यासाठी चालक आकाश याने चालू ट्रॅक्टरमधून उडी मारली. यावेळी आकाश हा उसाने भरलेल्या ट्रॉलीच्या चाकाखाली आला. चाक त्याच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत लहू श्यामराव खंडागळे यांनी शिराळा पोलिस ठाण्यात वर्दी दिली असून तपास हवालदार एन. जी. पवार हे करीत आहेत.

Web Title: Sugarcane transport tractor's hook broke, jumped to save life and found itself under the wheel in sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.