कडेगावात ऊसतोड बंद पाडली

By admin | Published: November 3, 2015 11:39 PM2015-11-03T23:39:35+5:302015-11-04T00:08:27+5:30

‘स्वाभिमानी’चे आंदोलन : वाहनांची हवा सोडली

The sugarcane was stopped in Gaya | कडेगावात ऊसतोड बंद पाडली

कडेगावात ऊसतोड बंद पाडली

Next

इस्लामपूर : एकरकमी एफआरपीसाठी आक्रमक झालेल्या वाळवा तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोनहिरा आणि क्रांती कारखान्याच्या कार्यक्षेत्रात धडक मारत ऊस तोडणी आणि उसाची वाहतूक फडातच रोखली. आसद, पाडळी या कडेगाव तालुक्यातील गावांमध्ये ऊस भरलेल्या वाहनांच्या टायरमधील हवा सोडण्यात आली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली उसाच्या एकरकमी एफआरपीसाठी एल्गार पुकारण्याची घोषणा केली आहे. ६ नोव्हेंबरला जयसिंगपूर येथे होणाऱ्या ऊस परिषदेची जय्यत तयारीही सुरू आहे. या परिषदेच्या पूर्वसंध्येलाच स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे स्पष्ट झाले.
गणेश शेवाळे, जयवंत पाटील, प्रशांत होनमाने व अन्य कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी आसद, पाडळी भागात सुरू असणाऱ्या सोनहिरा व क्रांती कारखान्याच्या ऊस तोडीकडे मोर्चा वळविला.
एकरकमी एफआरपी मिळालीच पाहिजे, त्याशिवाय उसाला हात लावू देणार नाही, अशी घोषणाबाजी करीत फडात उसाने भरलेल्या वाहनांच्या चाकातील हवा सोडत कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका स्पष्ट केली. या आंदोलनामुळे ऊसतोड थांबली आहे. (वार्ताहर)

वातावरण तापू लागले
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ६ नोव्हेंबरला जयसिंगपूर येथे ऊस परिषद होणार आहे. त्यासाठी जय्यत तयारीही सुरू आहे. मात्र तत्पूर्वीच ऊसतोडी थांबविण्याच्या, रोखण्याच्या आंदोलनातून वातावरण तापविण्यात येत आहे. यासाठी नदीकाठच्या तालुक्यांतील कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत.

Web Title: The sugarcane was stopped in Gaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.