उन्हाळा वाढू लागला की सांगलीकरांना शुगरकिंग’ कलिंगडाची भुरळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 07:16 PM2020-02-21T19:16:36+5:302020-02-21T19:20:32+5:30
बाजार समितीच्या आवारात सांगली जिल्'ातील वाळवा, मिरज, पलूस, कडेगाव या तालुक्यांसह कोल्हापूर जिल्'ातील शिरोळ तालुक्यातून, सोलापूर, गुलबर्गा, अक्कलकोट आणि कर्नाटक सीमा भागातून कलिंगडाची आवक सुरू आहे.
सांगली : उन्हाळ्याची चाहूल लागल्याने गारवा देणारी कलिंगडे बाजारात मोठ्या प्रमाणात दिसू लागली आहेत. सांगलीतील विष्णुअण्णा पाटील फळ मार्केटमध्ये शुक्रवारी ५० टन कलिंगडाची आवक झाली आहे. सध्या दररोज १० गाड्यांमधून कलिंगडाची आवक होऊ लागली आहे. गडद हिरव्या रंगाच्या ‘शुगर किंग’ या वाणाच्या कलिंगडाने सांगलीकरांना भुरळ घातली आहे. डझनाचा दर ६० ते ५०० रुपये असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
उन्हाळा वाढू लागला की बाजारात कलिंगडाला मागणी वाढते. शुक्रवारी महाशिवरात्रीनिमित्त उपवासासाठी कलिंगडाला चांगली मागणी होती. येथील विष्णुअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात आवक वाढली आहे.
गुरुवारी १०० टन, तर शुक्रवारी जवळपास ५० टन आवक झाली असून, डझनाला ६० ते ५०० रुपये असा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सहायक सचिव चंद्रकांत सरडे यांनी दिली. बाजार समितीच्या आवारात सांगली जिल्'ातील वाळवा, मिरज, पलूस, कडेगाव या तालुक्यांसह कोल्हापूर जिल्'ातील शिरोळ तालुक्यातून, सोलापूर, गुलबर्गा, अक्कलकोट आणि कर्नाटक सीमा भागातून कलिंगडाची आवक सुरू आहे. वाढत्या उन्हामुळे कलिंगडाला मागणीही वाढली आहे. गडद हिरव्या रंगाची कलिंगडे ‘शुगर किंग’ नावाने ओळखली जातात. नावाप्रमाणे त्याला गोडवा अधिक आहे. सांगलीतील विष्णुअण्णा पाटील फळ मार्केटमध्ये एकूण कलिंगडाच्या आवकेमध्ये ८० टक्के ‘शुगर किंग’ जातीची आवक झाली आहे.
‘नामधारी’ जातीच्या म्हणजे फिकट हिरवे पट्टे असणाºया लांबट आणि आकाराने मोठ्या असणाºया कलिंगडांची आवक कमी आहे. फ्रूट सॅलड आणि ज्युस बनवण्यासाठी कलिंगडाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. सध्या आवक मोठ्या प्रमाणात असल्याने किरकोळ बाजारात ‘शुगर किंग’ जातीचे फळ ४० ते ७०, तर नामधारी ३० ते ६० रुपये नग अशी विक्री होत आहे.
आवक कमी, दर तेजीत
उन्हाळ्याची चाहूल लागल्याने आणि महाशिवरात्रीच्या उपवासासाठी शुक्रवारी फळांना मागणी जास्त होती. त्यातही कलिंगडाचा क्रमांक वरचा होता. पण विष्णुअण्णा पाटील फळ मार्केटमध्ये केवळ ३० टन आवक झाली. आवक अत्यंत कमी झाल्यामुळे किरकोळ विक्रेत्यांनी प्रतिनग ४० ते ७० रुपये दराने विक्री केली. दर तेजीत असल्याचे होलसेल फ्रूट असोसिएशनचे अध्यक्ष सागर मदने यांनी सांगितले.