बामणोलीत प्रेमीयुगुलाची आत्महत्या, खत कारखान्याच्या गाेदामात घेतला गळफास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 12:57 PM2022-03-15T12:57:01+5:302022-03-15T12:57:36+5:30

कुपवाड : बामणोली (ता. मिरज) येथील दत्तनगर एमआयडीसीमधील एका खत कारखान्याच्या गाेदामात प्रेमी युगुलाने गळफास लावून आत्महत्या केली. हा ...

Suicide by hanging of boyfriend in Bamnoli miraj | बामणोलीत प्रेमीयुगुलाची आत्महत्या, खत कारखान्याच्या गाेदामात घेतला गळफास

बामणोलीत प्रेमीयुगुलाची आत्महत्या, खत कारखान्याच्या गाेदामात घेतला गळफास

googlenewsNext

कुपवाड : बामणोली (ता. मिरज) येथील दत्तनगर एमआयडीसीमधील एका खत कारखान्याच्या गाेदामात प्रेमी युगुलाने गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार साेमवारी सकाळी उघडकीस आला. घटनेची कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

पांडुरंग दादासाहेब दुधाळ (वय २१, रा. चिंतामणीनगर, सांगली) आणि काजल सुरेश सायार (वय १६, रा. दत्तनगर, बामनोली) अशी मृतांची नावे आहेत. याबाबत कुपवाड पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मृत पांडुरंग दुधाळ हा दत्तनगरमधील एका खत गाेदामात कामात होता, तर काजल ही शिक्षण घेत होती. काजल ही पांडुरंग काम करीत असलेल्या खत गाेदामालगतच वसाहतीत राहत होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध जुळले होते.

शनिवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे खत गाेदाम बंद झाले होते. रविवारी या गाेदामाला साप्ताहिक सुटी होती. गाेदाम बंद असल्याची संधी साधून पांडुरंग याने खत गाेदामाचे कुलूप तोडले. त्यानंतर दोघांनीही या गाेदामात प्रवेश करून छताच्या अँगलला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. सोमवारी नेहमीप्रमाणे गाेदामातील अन्य कर्मचारी कामावर आले असता, त्यांना कुलूप ताेडलेले दिसले. त्यांनी आत जाऊन पाहिले असता, पांडुरंग व काजल यांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले.

घटनेची माहिती कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यास देण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या घटनेची कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. आत्महत्येचे कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. कुपवाड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Suicide by hanging of boyfriend in Bamnoli miraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.