सांगलीत सासूला सूनेकडून मारहाण, कौटूंबिक वादातून घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 03:52 PM2019-03-18T15:52:12+5:302019-03-18T15:53:27+5:30

कौटूंबिक वादातून सासू हेमादेवी हेमचंद्र मिश्रा (वय ५५, रा. अथर्व लक्झरी अपार्टमेंट, घाडगे हॉस्पिटलजवळ, बायपास रस्ता, सांगली) यांना सुनेने झाडून मारहाण केली. त्यांना घरातूनही हाकलून लावले. रविवारी दुपारी बारा वाजता ही घटना घडली. याप्रकरणी सून आदिती वरुण मिश्रा हिच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Suicide case from Sangliat killer, incident from family dispute | सांगलीत सासूला सूनेकडून मारहाण, कौटूंबिक वादातून घटना

सांगलीत सासूला सूनेकडून मारहाण, कौटूंबिक वादातून घटना

Next
ठळक मुद्देसांगलीत सासूला सूनेकडून मारहाण, कौटूंबिक वादातून घटनाशिवीगाळ करुन घराबाहेर हाकलून काढले,पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सांगली : कौटूंबिक वादातून सासू हेमादेवी हेमचंद्र मिश्रा (वय ५५, रा. अथर्व लक्झरी अपार्टमेंट, घाडगे हॉस्पिटलजवळ, बायपास रस्ता, सांगली) यांना सुनेने झाडून मारहाण केली. त्यांना घरातूनही हाकलून लावले. रविवारी दुपारी बारा वाजता ही घटना घडली. याप्रकरणी सून आदिती वरुण मिश्रा हिच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारहाणीत जखमी झालेल्या हेमादेवी मिश्रा यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. मिश्रा कुटूंबाचे मूळ गाव सिंकदरा (जि. आग्रा, राज्य उत्तर प्रदेश) आहे. व्यवसायानिमित्त काही वर्षापूर्वी हे कुटूंब सांगलीत स्थायिक झाले आहे. बायपास रस्त्यावरील अथर्व लक्झरी अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये ते राहतात.

रविवारी सकाळी हेमादेवी व त्यांची सून आदिती मिश्रा यांच्यात कौटूंबिक कारणावरुन कडाक्याचे भांडण झाले. यातून आदितीने हेमादेवी यांना झाडून बेदम मारहाण केली. शिवीगाळ करुन त्यांचा मोबाईल व कपड्यांची बॅग घराबाहेर फेकून दिली. त्यांनाही घराबाहेर हाकलून काढले.

या घटनेनंतर हेमादेवी मिश्रा यांनी थेट शहर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सूनेला अजून अटक केलेली नाही.

Web Title: Suicide case from Sangliat killer, incident from family dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.