आष्ट्यात महाविद्यालयीन युवतीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:25 AM2021-03-28T04:25:48+5:302021-03-28T04:25:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आष्टा : येथील रावळ प्लॉटमधील अंकिता धनंजय कांबळे (वय २३) हिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : येथील रावळ प्लॉटमधील अंकिता धनंजय कांबळे (वय २३) हिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री ११ ते शनिवारी सकाळी ७ च्यादरम्यान घडली.
आष्टा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. आत्महत्येचे कारण समजल शकले नाही.
अंकिता कांबळे मूळची भुई वाडा बेस्ट कॉलनी, दादर (मुंबई) येथील आहे. आष्टा येथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी ती रावळ कॉलनीत मामा भानुदास कांबळे यांच्या घरी वास्तव्यास होती. शुक्रवार, दि. २६ रोजी रात्री ११ वाजता अंकिता आपल्या खोलीत झोपण्यास गेली. शनिवार, दि. २७ रोजी सकाळी अंकिता झोपेतून उठली नाही म्हणून भानुदास तिला उठवण्यात गेले. हाक मारूनही अंकिताने आतून आवाज दिला नाही. यामुळे खिडकी उघडून पाहिले असता अंकिताने फॅनला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. याबाबत आष्टा पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह आष्टा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनास पाठविला. जीवदान कांबळे यांनी पोलिसांत फिर्याद दिली.