फसवणुकीतील संशयिताची आत्महत्या

By admin | Published: February 27, 2017 12:11 AM2017-02-27T00:11:41+5:302017-02-27T00:11:41+5:30

गळफास घेतला; सांगलीतील डॉक्टरला गंडा प्रकरण

Suicide suspect suicide | फसवणुकीतील संशयिताची आत्महत्या

फसवणुकीतील संशयिताची आत्महत्या

Next


सांगली/कळे : विश्रामबाग येथील डॉक्टरला सात लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या १२ तासांत सचिन विठ्ठल येरुडकर (वय ३२, रा. घरपण, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) या संशयिताने आत्महत्या केली. घरपण येथे त्याच्या घरी रविवारी सकाळी घटना घडली. हेमंत पाटील, डॉ. शरद सावंत यांची नावे असलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे.
डॉक्टरांच्या मुलाला एमबीबीएसला प्रवेश मिळवून देतो, असे आमिष दाखविल्याची तक्रार आहे. बुर्ली (ता. पलूस) येथील जिल्हा परिषद सदस्य हेमंत पाटील, सचिन यरुडकर व माळी (पूर्ण नाव निष्पन्न नाही) या तिघांनी संगनमत करून मुलाच्या प्रवेशासाठी सात लाखांची मागणी केली. दि. २४ ते २६ जुलै २०१६ या कालावधित सात लाखांची ही रोकड त्यांनी डॉक्टरच्या रुग्णालयातून घेतली होती. याला आठ महिने झाले तरीही संशयितांनी एमएबीबीएसला प्रवेश मिळवून दिला नाही.
त्यामुळे डॉक्टरने पैसे परत मागितले. यावर हेमंत पाटील, यरुडकरसह तिघांनी पैसे देण्यास नकार देऊन, तुला काय करायचे ते कर, तुला बघून घेतो, अशी धमकी दिली. त्यामुळे डॉक्टरने शनिवारी रात्री उशिरा विश्रामबाग पोलिसात फिर्याद दाखल केली होती.
गुन्हा दाखल झाल्याची चाहूल लागताच यरुडकर याने रविवारी सकाळी घरपण येथील घरातील दुसऱ्या मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केली. यरुडकर यांची पत्नी कामानिमित्त दुसऱ्या मजल्यावर गेल्यानंतर आत्महत्येचा हा प्रकार उघडकीस आला. आत्महत्या करण्यापूर्वी यरुडकर यांनी चिठ्ठी लिहिली आहे.
आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतील मजकूर
‘नमस्कार, मी सचिन विठ्ठल येरूडकर, माझा या डॉक्टर प्रकरणात कोणताही संबंध नसून माझे नाव कारण नसताना या प्रकरणात घातले आहे. या प्रकरणात डॉक्टर यांनी मला गोवले आहे. तरी मी आत्महत्या करीत आहे. यासाठी हेमंत पाटील, डॉ. शरद सावंत हे असून, यांना जबाबदार धरण्यात यावे. कळावे आपला सचिन येरूडकर, सही’ असा मजकूर आहे. अशा आशयाची चिठ्ठी सचिनच्या पँटच्या खिशात सापडली.
पोलिस पोहोचले; पण...
गुन्हा दाखल झाल्याने संशयित फरारी होतील, असा विचार करुन विश्रामबाग पोलिसांची दोन पथके बुर्लीत हेमंत पाटील व यरुडकर याच्या शोधासाठी घरपण येथे रविवारी सकाळी रवाना झाली होती. पोलिस यरुडकरच्या घरात पोहोचले. परंतु यरुडकर याने आत्महत्या केल्याचे समजताच पोलिसांना धक्का बसला. स्थानिक पोलिसांकडून या घटनेची माहिती घेऊन पथक दुपारी हात हलवित सांगलीत परतले.

Web Title: Suicide suspect suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.