आत्महत्याप्रकरणी संशयितांवर लवकरच अटकेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:25 AM2021-02-12T04:25:34+5:302021-02-12T04:25:34+5:30
सांगली : शहरातील हरभट रोडवर असलेल्या सराफ दुकानात हरिश्चंद्र नारायण खेडेकर (वय ८२, रा. विनायक चौक, गावभाग) यांनी रविवारी ...
सांगली : शहरातील हरभट रोडवर असलेल्या सराफ दुकानात हरिश्चंद्र नारायण खेडेकर (वय ८२, रा. विनायक चौक, गावभाग) यांनी रविवारी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीनुसार आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील संशयितांना लवकरच अटक करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, मुंबईच्याही एका सावकारानेही खेडेकर यांना त्रास दिला होता. त्याचाही पोलिसांनी शोध सुरू केला आहे.
रविवारी आत्महत्या करण्यापूर्वी खेडेकर यांनी चिठ्ठी लिहिली होती. यात व्यवसायात झालेली फसवणूक व सावकारीमुळे आर्थिक नुकसान झाल्याने आत्महत्या करत असल्याचा उ्ल्लेख केला होता. त्यानुसार, मधुकर कृष्णाजी खेडेकर (रा. नवभारत चौक, सांगली), श्रीकांत ऊर्फ बाळू विष्णुपंत खेडेकर (रा. ढवळे तालीममागे, सांगली), सदानंद विष्णुपंत खेडेकर, प्रकाश विष्णुपंत खेडेकर (दोघे रा. गावभाग, सांगली), राजू शिरवटकर (रा. गावभाग, सांगली), वैभव प्रमोद पिराळे (रा. पिराळे ज्वेलर्स, सराफ कट्टा, सांगली), दिवाकर पोतदार (रा. शेडबाळ, ता. कागवाड, जि. बेळगाव), सुनील पंडित (रा. विटा) या आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या सर्व संशयितांना लवकरच अटक करण्यात येणार आहे. मुंबईतील एका सावकारानेही खेडेकर यांना त्रास दिल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्याने त्याचाही शोध सुरू करण्यात आला आहे. लवकरच सर्व संशयितांना अटक करण्यात येणार आहे.