तासगाव येथील तंत्रनिकेतन कॉलेजच्या विद्यार्थिनीची वसतीगृहात आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2018 03:27 PM2018-01-21T15:27:22+5:302018-01-21T15:50:37+5:30
शासकीय महिला तंत्रनिकेतनमधे ड्रेस डिज़ायनिंग डिप्लोमाच्या द्वितीय वर्षात शिकाणाऱ्या प्रणाली प्रकाश पाटील (वय १७, मुळ गांव साखराळे ता. वाळवा) या तरुणीने रविवारी (ता. २१) पहाटेच्या सुमारास वसतिगृहातील खोलीत ओढणीने गळफांस घेऊन आत्महत्या केली.
तासगाव - येथील शासकीय महिला तंत्रनिकेतनमधे ड्रेस डिज़ायनिंग डिप्लोमाच्या द्वितीय वर्षात शिकाणाऱ्या प्रणाली प्रकाश पाटील (वय १७, मुळ गांव साखराळे ता. वाळवा) या तरुणीने रविवारी (ता. २१) पहाटेच्या सुमारास वसतिगृहातील खोलीत ओढणीने गळफांस घेऊन आत्महत्या केली.
याबाबत पोलिसातूंन मिळालेली अधिक माहिती अशी, तासगाव येथे तासगाव ते मणेराजुरी रस्त्यालगत शासकीय महिला तंत्रनिकेतन महाविद्यालय आहे. या ठिकाणी प्रणाली डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहत होती. ती राहत असलेल्या खोलीतील अन्य तीन मुली शनिवारी सुट्टी काढून घरी गेल्या होत्या. त्यामुळे रविवारी प्रणाली एकटीच खोलीत होती.
रविवारी सकाळी उशीरापर्यन्त खोलीचा दरवाजा उघडला नाही. त्यामुळे शेजारील खोलीतील मुलींनी डोकावून पाहिले असता, तिने गळफांस घेतल्याचे निदर्शनास आले. पहाटेच्या सुमारास पंख्याला ओढणीच्या सहाय्याने फास लावून आत्महत्या केली होती. मुलींनी ही माहिती वसतिगृहाच्या अधीक्षिकांना दिली. त्यांनी पोलिसाना कळवल्यानंतर घटनास्थळावर येऊन पोलिसांनी पंचनामा केला. याबाबत तासगाव पोलिसात नोंद झाली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजु शकले नाही. मात्र या घटनेने महाविद्यालयात खळबळ उडाली आहे.