‘सुखकर्ता’ बंधारा म्हणजे पोलिसांचे रचनात्मक काम

By admin | Published: May 19, 2017 11:37 PM2017-05-19T23:37:23+5:302017-05-19T23:37:23+5:30

‘सुखकर्ता’ बंधारा म्हणजे पोलिसांचे रचनात्मक काम

The 'Sukkari' Bandar is the creative work of the police | ‘सुखकर्ता’ बंधारा म्हणजे पोलिसांचे रचनात्मक काम

‘सुखकर्ता’ बंधारा म्हणजे पोलिसांचे रचनात्मक काम

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : पोलिसांनी डॉल्बीमुक्तीतून साकारलेला ‘सुखकर्ता’ बंधारा म्हणजे रचनात्मक काम आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले. मल्लेवाडी (ता. मिरज) येथे बांधलेल्या सिमेंट बंधाऱ्याचे लोकार्पण फडणवीस यांनी शुक्रवारी केले. यावेळी ते बोलत होते. सामाजिक कामासाठी पुढाकार घेणाऱ्या पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या कल्पकतेचे त्यांनी यावेळी कौतुक केले.
मल्लेवाडी येथे पोलिस दलातर्फे सिमेंट बंधारा बांधण्यात आला आहे. जिल्ह्यातील ८६३ सार्वजनिक गणेश मंडळांकडून डॉल्बीऐवजी बंधाऱ्यासाठी सुमारे २७ लाख ८० हजाराचा निधी संकलित करून मल्लेवाडी व मणेराजुरी येथे बंधारे बांधला आहे. ध्वनी प्रदूषणाऐवजी जलसंचयासाठी निधी दिल्याबद्दल गणेश मंडळांचे व गणेश मंडळांकडून संकलित झालेल्या निधीचा पोलिस कल्याण निधीऐवजी समाजासाठी वापर करणाऱ्या पोलिस अधीक्षक शिंदे यांच्या कल्पकतेचे फडणवीस यांनी कौतुक केले. पाण्यातून परिवर्तन घडविण्याच्या अशा रचनात्मक कामासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
मिरजेतील सुभाषनगर येथे मिरज डेव्हलपमेंट फोरमतर्फे ऐतिहासिक आगट तलावातील लोकसहभागातून गाळ काढण्याच्या कामाची फडणवीस यांनी पाहणी केली. शिवाजी महाराजांनी उत्तम जलव्यवस्थापन केले होते. पूर्वीच्या काळात संस्थानिकांनी पाणीशास्त्राचा अभ्यास करून तलावाची निर्मिती केली होती. मात्र गाळ व अतिक्रमणामुळे ही नैसर्गिक व्यवस्था बिघडली आहे. जुन्या आगट तलावाचे पुनरूज्जीवन करून तलावाच्या शास्त्रशुध्द बांधणीचा वापर केल्याने पाणीसंचय व भूगर्भातील पाणी पातळीत वाढ होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मकरंद देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. पालकमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खा. संजयकाका पाटील, आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, पंचायत समितीच्या सभापती जनाबाई पाटील, उपसभापती काकासाहेब धामणे, किशोर पटवर्धन, मोहन वनखंडे, रविकांत साळुंखे, बाळासाहेब डोंगरे-माळी, गजेंद्र कुळ्ळोळी, शीतल पाटोळे आदी उपस्थित होते.

Web Title: The 'Sukkari' Bandar is the creative work of the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.