कडेगाव तालुक्यात ताकारीचे उन्हाळी आवर्तन बंद, शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 03:46 PM2022-04-21T15:46:39+5:302022-04-21T15:59:09+5:30

ऐन उन्हाळ्यात कमी कालावधीत आवर्तन बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

Summer cycle of Takari stopped in Kadegaon taluka, intense resentment from farmers | कडेगाव तालुक्यात ताकारीचे उन्हाळी आवर्तन बंद, शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी

कडेगाव तालुक्यात ताकारीचे उन्हाळी आवर्तन बंद, शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी

googlenewsNext

देवराष्ट्रे : कडेगाव तालुक्यात ताकारी योजनेचे पहिले उन्हाळी आवर्तन ४५ दिवस चालणार होते; पण प्रशासनाने ३५ दिवसांत आवर्तन बंद केल्यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ऐन उन्हाळ्यात कमी कालावधीत आवर्तन बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

ताकारी योजनेच्या माध्यमातून उन्हाळी व हिवाळी अशी पाच ते सहा आवर्तने सोडली जातात. या आवर्तनाच्या माध्यमातून रब्बी व वर्षभर असणाऱ्या पिकांना पाणीपुरवठा केला जातो. १४ मार्च रोजी सुरू झालेले पहिले उन्हाळी आवर्तन ४५ दिवस चालणार होते. मात्र, हे आवर्तन ३५ दिवस चालवून योजना बंद करण्यात आली आहे. सर्वांना पाणी मिळाले असा अधिकारी दावा करत असले तरी आवर्तन कमी कालावधीत बंद करण्याचे कारण कळले नाही.

Web Title: Summer cycle of Takari stopped in Kadegaon taluka, intense resentment from farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.