आष्ट्यात परवेज इनामदार यांचे उन्हाळी सोयाबीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:11 AM2021-05-04T04:11:29+5:302021-05-04T04:11:29+5:30
आष्टा : आष्टा येथील प्रगतशील शेतकरी परवेज इनामदार यांनी उसात उन्हाळी सोयाबीनचे आंतरपीक घेतले आहे. एका झाडाला सुमारे २५० ...
आष्टा : आष्टा येथील प्रगतशील शेतकरी परवेज इनामदार यांनी उसात उन्हाळी सोयाबीनचे आंतरपीक घेतले आहे. एका झाडाला सुमारे २५० पेक्षा जास्त शेंगा लागल्या आहेत. सुमारे १२ क्विंटल उत्पादन मिळेल, असा त्यांचा अंदाज आहे.
परवेज इनामदार यांची आष्टा-मर्दवाडीनजीक गारपीर भागात शेती आहे. या शेतीत त्यांनी ऊस, हळद, हरभरा ही पिके केली होती. परवेज इनामदार यांनी डिसेंबरमध्ये सुरू उसाची लागण केली होती. वाळवा तालुका कृषी विभागाच्या आष्टा येथील मदतनीस सरिता कनुंजे यांच्या सल्ल्यावरून इनामदार यांनी ‘केडीएस ७२६ संगम’ या सोयाबीन पिकाची सुरू उसात लागवड केली. त्याला वेळोवेळी पाणी तसेच कीटकनाशक फवारणी करण्यात आली. इनामदार यांनी सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिले असून, गांडूळखत व कंपोस्ट खताचा नियमित वापर करत आहेत. सध्या सोयाबीनचे पीक जोमात असून, ९० दिवस पूर्ण झाले आहेत. एका झाडाला २५० पेक्षा जास्त शेंगा लागलेल्या आहेत. या झाडावर कोणताही रोग आलेला नाही. एकरी १२ क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे. खरीप हंगामासाठी या सोयाबीनचे बियाणे उपलब्ध होणार आहे. त्यांना सरिता कनुंजे यांच्यासह मधुकर घाटगे यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो : ०३ आष्टा १
ओळ : आष्टा येथील परवेज इनामदार यांनी सुरू उसात उन्हाळी सोयाबीनचे पीक घेतले आहे. हे पीक जोमदार आले आहे. एका झाडाला २५० पेक्षा जास्त शेंगा लागल्या आहेत.