शिराळा नगराध्यक्षपदी सुनीता निकम यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:41 AM2020-12-12T04:41:59+5:302020-12-12T04:41:59+5:30

शिराळा : शिराळा नगरपंचायत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी एकमेव उमेदवारी अर्ज राहिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या बांधकाम सभापती सुनीता निकम यांची ...

Sunita Nikam elected as Shirala Mayor | शिराळा नगराध्यक्षपदी सुनीता निकम यांची निवड

शिराळा नगराध्यक्षपदी सुनीता निकम यांची निवड

Next

शिराळा : शिराळा नगरपंचायत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी एकमेव उमेदवारी अर्ज राहिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या बांधकाम सभापती सुनीता निकम यांची नगराध्यक्षपदी; तर उपनगराध्यक्षपदी विजय दळवी यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण केली.

येथील नगरपंचायत सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी नागेश पाटील व सहायक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्याकडे नगराध्यक्ष पदासाठी सुनीता निकम व प्रतिभा पवार यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मात्र पवार यांनी अर्ज माघारी घेतला. उपनगराध्यक्ष पदासाठी विजय दळवी यांचा एकमेव अर्ज आला होता.

प्रांताधिकारी पाटील यांनी सुनीता निकम यांची नगराध्यक्षपदी, तर उपनगराध्यक्षपदी विजय दळवी यांची निवड केली. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. मावळत्या नगराध्यक्षा अर्चना शेटे, कीर्तीकुमार पाटील, सुनंदा सोनटक्क, गौतम पोटे, संजयसिंह निकम, ॲड. नेहा सूर्यवंशी, विजयराव नलवडे, माजी सरपंच प्रमोद नाईक, संजय हिरवडेकर, मोहन जिरंगे, सुजाता इंगवले, आशाताई कांबळे, प्रतिभा पवार, सीमा कदम, ‘विश्वास’चे संचालक विश्वास कदम, राजेश्री यादव, बसवेश्वर शेटे, रमेश शेटे, महादेव कुरणे, सुनील कवठेकर, संतोष देशपांडे, मकरंद उबाळे, वासिम मोमीन, महेश खंडागळे आदी उपस्थित होते.

फोट-११शिराळा०१

फोटो- शिराळा नगरपंचायत नूतन नगराध्यक्षपदी सुनीता नाईक, उपनगराध्यक्ष विजय दळवी यांचा प्रांताधिकारी नागेश पाटील, मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी सत्कार केला.

Web Title: Sunita Nikam elected as Shirala Mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.