अंधश्रद्धा कार्यक्रम ग्रामस्थांनी उधळला
By admin | Published: July 20, 2014 11:33 PM2014-07-20T23:33:58+5:302014-07-20T23:42:38+5:30
डफळापुरातील घटना : करणीचा प्रकारडफळापूर
डफळापूर : डफळापूर (ता. जत) येथे तीन महिने गावाच्या मध्यभागी एका घरात अंधश्रद्धेतून करणी, भूतबाधा काढणे, समस्यांचे निवारण करणे याबाबतची शिकवण दिली जात होती. हा प्रकार जागरूक ग्रामस्थांनी उधळून लावला. ही घटना शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली.
डफळापुरात मिरजेहून आलेल्या काही लोकांनी स्थानिकांचा आधार घेत गावच्या मध्यभागी आपले बस्तान बसविले. तीन महिन्यांपासून दर शनिवारी येथे दरबार भरवला जायचा. अशिक्षित महिला-पुरुष आपल्या समस्या सोडविण्यासाठी या दरबारात सामील होऊ लागले. मिरजेहून आलेली मंडळी अशा प्रकारांच्या माध्यमातून अनेक समस्या सुटू शकतात, असे भोळ्याभाबड्या अशिक्षित लोकांना सांगत होते. त्यांच्या मनावर या गोष्टी बिंबवत होते. या दरबारामध्ये भूतबाधा, करणी, रोगातून मुक्त करणे, अंधांना दृष्टी देणे, मूल नसेल त्यांना मुले होतील, असा दावा केला जात होता. शनिवारी दरबार भरल्यावर काही ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन हा प्रकार बंद पाडला. (वार्ताहर)
--जिल्ह्याच्या अनेक भागात अजूनही अशाप्रकारच्या अंधश्रद्धा पसरविल्या जात आहेत. नांद्रे (ता. मिरज) येथील दर्गा परिसरातही सुरू असलेला भोंदुगिरीचा प्रकार काही दिवसांपूर्वी बंद पाडला होता.