सर्वसामान्यांचा आधारवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:24 AM2021-08-01T04:24:38+5:302021-08-01T04:24:38+5:30
‘घार उडे आकाशी...पण चित्त तिचे पिलापाशी...’ या उक्तीप्रमाणे नाना पुण्यात स्थायिक असूनही त्यांनी कधीही गावाशी नाळ तुटू दिली नाही. ...
‘घार उडे आकाशी...पण चित्त तिचे पिलापाशी...’ या उक्तीप्रमाणे नाना पुण्यात स्थायिक असूनही त्यांनी कधीही गावाशी नाळ तुटू दिली नाही. कामाची ओढ त्यांना सतत गावाच्या सर्वांगिण विकासासाठी हाक देत राहिली. त्यामुळे गावकऱ्यांनीही नानांवर भरभरुन प्रेम केले. गावातील सर्व सत्ताकेंद्रे नानांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीपथावर आहेत. वडील पंढरीनाथ पाटील हे पंचक्रोशीतील आदरणीय व्यक्तिमत्व होते. त्यांनी स्वत:ची गावातील मोक्याच्या ठिकाणची जागा सोसायटीला दिली. उच्चशिक्षणासाठी नाना पुण्यात गेले. त्यांनी विद्यार्थी संघटना व चळवळीमध्ये सहभाग घेतला. पुण्याच्या धोंडीमामा साठे कॉलेजच्या सचिवपदी नानांनी काम केले. त्यांच्या आंदोलनामुळे देशातील पहिल्या होमिओपॅथिक पदवी कॉलेजला मान्यता मिळाली. याच कॉलेजला पुणे विद्यापीठात समावेशासाठी नानांनी संघर्ष केला.
वडील पंढरीनाथअण्णांच्या निधनानंतर गावाची संपूर्ण जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. राजकारणात काम करताना आपले सामाजिक भान त्यांनी कधीही ढळू दिले नाही. माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्यासमवेतही त्यांनी काम केले. २००४मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने त्यांनी तासगाव विधानसभेची निवडणूक लढवली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री जयंत पाटील, खासदार संजय पाटील, आमदार सुमनताई पाटील यांच्याबरोबर काम करत त्यांनी आपल्या कतृर्त्वाचा आलेख उंचावला.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेची निवडणूक न भूतो न भविष्यती असा संघर्ष करत कोणावर अवलंबून न राहता एकतर्फी जिंकली. जिल्हा बँकेत शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि कर्मचारी यांच्या प्रश्नांबाबत नाना नेहमीच हळवे राहिले. शेतकऱ्यांची कर्जमाफी असो, सोसायटीकडून शेतकऱ्यांची होणारी अडवणूक असो, सामान्य शेतकऱ्यांचे कर्ज अडणार नाही, यासाठी नाना नेहमीच आग्रही राहिले. कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेत संचालक मंडळात हिरिरीने मांडण्यात त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. बँकेचा कर्जपुरवठा हा जास्तीत जास्त सामान्य लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
गावोगावच्या आर्थिक उलाढालीचा कणा असणाऱ्या विकास सोसायटी या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आत्मा आहेत. त्यामुळे आर्थिकदृष्टया दुर्बल झालेल्या विकास सोसायट्यांच्या सबलीकरणावर जोर दिला पाहिजे, अशी भूमिका प्रतापनानांनी सातत्याने बँकेच्या संचालक मंडळासमोर मांडली. डोर्लीसारखी बंद पडलेली विकास सोसायटी पुनर्जीवित करत शेतकऱ्यांचा पतपुरवठा पूर्ववत केला. जुन्या इमारतीमधून कारभार हाकणाऱ्या विकास सोसायट्यांना इमारत बांधकाम करण्यासाठी बिनव्याजी वीस लाख रुपये संचालक मंडळ व प्रशासनाच्या सहकार्याने मंजूर करून दिले.
आरफळ, ताकारी, टेंभूच्या पाण्यासाठी नानांनी जोरदार संघर्ष केला. गावकऱ्यांनी एकतर्फी नानांच्या हाती सत्ता दिली. ग्रामपंचायत इमारत, अंतर्गत पाईपलाईन, रस्ते व गटारे बांधून गावाचा कायापालट केला. शिरगावला महाराष्ट्रातील पहिली डिजिटल ग्रामपंचायत होण्याचा मान प्रतापनानांनी मिळवून दिला. गावात जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे पहिले एटीएम सुरु केले. वडिलांनी जागा दिलेल्या सोसायटीची सुसज्ज इमारत उभी केली. नुसती इमारत नव्हे तर ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती बँकेची मिनी शाखाच तिथे सुरू केली.
नेहमी स्पष्ट बोलणार पण खरे बोलणार, गावाच्या विकासासाठी सतत झटणाऱ्या डॉ. प्रतापनाना पाटील यांचा आज वाढदिवस आहे. नानांना वाढदिवसाच्या लाख-लाख शुभेच्छा!