कारखान्याच्या प्रगतीसाठी सहकार पॅनललाच साथ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:18 AM2021-06-24T04:18:54+5:302021-06-24T04:18:54+5:30
रेठरे हरणाक्ष (ता.वाळवा) येथे सभेत डॉ. सुरेश भोसले यांनी भाषण केले. लोकमत न्यूज नेटवर्क शिरटे : कृष्णा कारखान्याच्या इतिहासात ...
रेठरे हरणाक्ष (ता.वाळवा) येथे सभेत डॉ. सुरेश भोसले यांनी भाषण केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरटे : कृष्णा कारखान्याच्या इतिहासात सभासदांना दरवर्षी प्रतिशेअर ६० किलो मोफत साखर देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणाऱ्या जयवंतराव भोसले सहकार पॅनलने, आता सभासदांनाही ६० किलो मोफत साखर घरपोच देण्याची घोषणा केली आहे.
रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) येथे कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ सहकार पॅनलची सभा झाली. यावेळी अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, माजी अध्यक्ष मदनराव मोहिते, कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ.अतुल भोसले, उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक व उमेदवार संजय पाटील, जे. डी. मोरे, जितेंद्र पाटील, संचालक सुजीत मोरे, कृष्णा बँकेचे उपाध्यक्ष दामाजी मोरे, भगवानराव पाटील उपस्थित होते.
डॉ. भोसले म्हणाले, गेल्या पाच वर्षांत सरासरी तीन हजार रुपयांपेक्षा जास्त दर आम्ही सभासदांना दिला आहे. डिस्टिलरी चांगली चालविली आहे. कृषी महाविद्यालयाची सुसज्ज इमारत साकारून विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आहे. नवा इथेनॉल प्रकल्प साकारला आहे.
मदनराव मोहिते म्हणाले की, अविनाश मोहिते हे अपघाताने तयार झालेले नेतृत्व आहे. कारखाना चालवायला या माणसाने एक पत्रकार ‘बाबा’ नेमला. तो पत्रकार एवढा हुशार की त्याने मनोमिलनच होऊ दिले नाही.
चौकट
मागणीला मिळाली दाद
सभासदांना दिली जाणारी मोफत साखर घरपोच द्यावी, अशी मागणी डॉ. अतुल भोसले यांनी सभेत केली. त्यांच्या या मागणीला सभेतून जोरदार प्रतिसाद मिळाला. त्यानंतर डॉ. सुरेश भोसले यांनी सहकार पॅनल सर्व सभासदांना मोफत साखर घरपोच देईल, अशी घोषणा केल्यावर सभासदांनी मोठ्या उत्साहात याचे स्वागत केले.