जिल्ह्यातील निराधारांना आधार; अकरा कोटींचा निधी मिळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:27 AM2021-05-08T04:27:58+5:302021-05-08T04:27:58+5:30
केंद्र व राज्य शासनाच्यावतीने संयुक्तपणे समाजातील निराधार घटकांना आधार देण्यासाठी योजना राबवितात. रकमेपेक्षा त्यांना मिळणारा आधार महत्त्वाचा असल्याने लाभार्थीना ...
केंद्र व राज्य शासनाच्यावतीने संयुक्तपणे समाजातील निराधार घटकांना आधार देण्यासाठी योजना राबवितात. रकमेपेक्षा त्यांना मिळणारा आधार महत्त्वाचा असल्याने लाभार्थीना या अनुदानाची प्रतीक्षा असते.
संजय गांधी निराधारच्या तीन योजना, श्रावणबाळ सेवा निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा, दिव्यांग आणि राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतील लाभार्थ्यांना हे अनुदानाचे वाटप केले जाणार आहे.
जिल्ह्यात या योजनांतील लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी एप्रिल व मे महिन्यांतील अनुदानाचे वाटप करण्यात आल्याने या गरजू घटकाला दिलासा मिळाला आहे.
चौकट
जिल्ह्यातील योजनानिहाय लाभार्थी संख्या
संजय गांधी निराधार योजना ३२७५९
श्रावणबाळ योजना ११३५१
इंदिरा गांधी निवृत्तिवेतन योजना ५०३६
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना ७३१
इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवत्तिवेतन योजना १३४
कोट
कोरोना कालावधीत निराधारांना सहाय्य ठरण्यासाठी शासनाने दोन महिन्यांचे अनुदान दिले आहे. त्यानुसार हे अनुदान तालुका पातळीवर देण्यात आले असून, तिथून ते लाभार्थ्यांना मिळणार आहे.
डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी