गावासाठी राबणाऱ्या लोकांना साथ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:26 AM2021-05-09T04:26:18+5:302021-05-09T04:26:18+5:30
फोटो ओळ : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले यांनी घरोघरी भेटी देऊन कोरोनाबाबतीत प्रबोधन ...
फोटो ओळ : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले यांनी घरोघरी भेटी देऊन कोरोनाबाबतीत प्रबोधन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कसबे डिग्रज : कसबे डिग्रज जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले यांनी कसबे डिग्रजमधील कोरोना रुग्णांना आधार देण्यासाठी घरोघरी जाऊन कुटुंबातील सर्वांच्या आरोग्याची आस्थेने चौकशी केली. गृहविलगीकरणामधील भेटीदरम्यान कोरोनाग्रस्तांना होणारा त्रास, आहार, व्यायाम यासह विविध माहिती घेतली. यावेळी बिकट परिस्थितीत गावासाठी राबणाऱ्या लोकांना साथ द्या, असे आवाहन केले
कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. रुग्णालयात बेड शिल्लक नाहीत, इंजेक्शन आवश्यकतेपेक्षा कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. सरकारच्या माध्यमातून विविध उपाययोजना केल्या जात आहेतच, याशिवाय लोकहीत लक्षात घेऊन अनेक गावांमध्ये स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू ूलावला जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना आधार देण्यासाठी व त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी विशाल चाैगुले यांनी मराठी मुलांच्या शाळेत संस्था विलगीकरणमध्ये असणाऱ्या लोकांची भेट घेतली.
कोरोना पॉझिटिव्ह असणारे, परंतु गृहविलगीकरणमध्ये असणाऱ्या लोकांची आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समवेत भेट घेऊन चौकशी केली. त्यांना धीर देत मास्क, सॅनिटायझरचे वाटप करून कोणाच्या संपर्कात येऊ नये, आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले. यावेळी डॉ.शरद कुंवर, आरोग्य सहायक मनोज कोळी, कृषी सहायक गीतांजली चव्हाण व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.