‘कृष्णा’च्या गतवैभवासाठी ‘सहकार’ला साथ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:26 AM2021-04-22T04:26:47+5:302021-04-22T04:26:47+5:30

बिचूद (ता. वाळवा) येथे डॉ. सुरेश भाेसले यांच्याहस्ते हरिभाऊ सावंत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मदनराव मोहिते, पांडुरंग होनमाने, ...

Support ‘Sahakar’ for the past glory of ‘Krishna’ | ‘कृष्णा’च्या गतवैभवासाठी ‘सहकार’ला साथ द्या

‘कृष्णा’च्या गतवैभवासाठी ‘सहकार’ला साथ द्या

Next

बिचूद (ता. वाळवा) येथे डॉ. सुरेश भाेसले यांच्याहस्ते हरिभाऊ सावंत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मदनराव मोहिते, पांडुरंग होनमाने, जितेंद्र पाटील, सुजित मोरे, डॉ. सुशिल सावंत उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरटे : कृष्णाकाठावरती आप्पा-भाऊंचा सुवर्णकाळ पुन्हा निर्माण करण्यासाठी माझ्या कार्यकर्त्यांनी सहकार पॅनेलमध्ये सामील व्हावे, असे आवाहन ‘कृष्णा’चे माजी अध्यक्ष मदनराव मोहिते यांनी केले. याचवेळी त्यांनी अविनाश मोहिते यांच्या भ्रष्ट कारभारावर सडकून टीका केली.

बिचूद (ता. वाळवा) येथे रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य हरिभाऊ सावंत, उद्योजक सुनील सावंत, सयाजी पाटील, सुभाष पाटील यांनी आपल्या समर्थकांसह सहकार पॅनेलमध्ये प्रवेश केला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ‘कृष्णा’चे अध्यक्ष डॉ. सुरेश भाेसले, संचालक जितेंद्र पाटील, सुजित मोरे, पांडुरंग होनमाने, डॉ. सुशिल सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्ष डॉ. सुरेश भाेसले म्हणाले, अविनाश मोहिते यांच्या कार्यकाळात कारखान्याचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. गत निवडणुकीत पुन्हा सत्ता त्यांच्याकडे दिली असती तर आज कारखानाच राहिला नसता. आम्ही सहा वर्षे झाली मोफत साखर देत आहे आणि यापुढेही देणार आहे.

हरिभाऊ सावंत, बाळासाहेब पाटील, अशोक पाटील, सौरभ सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. सुशिल सावंत यांनी स्वागत केले. प्रकाश रसाळ यांनी सूत्रसंचालन केले. कुलदीप पाटील यांनी आभार मानले.

यावेळी माजी पंचायत समिती सदस्य सुनील पोळ, सरपंच राजेश कांबळे, प्रकाश देसाई, शंकर मोहिते, सुनील चंद, अशोक गोडसे, युवराज गोडसे, विलास मोहिते, महिपती पाटील, आबासाहेब पाटील, संदीप डिसले आदी उपस्थित होते.

Web Title: Support ‘Sahakar’ for the past glory of ‘Krishna’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.