कष्टाळू महिलांना जिल्हा परिषदेचे पाठबळ : संग्रामसिंह देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 12:27 AM2018-03-09T00:27:03+5:302018-03-09T00:27:03+5:30

Support of the Zilla Parishad for hardworking women: Sangram Singh Deshmukh | कष्टाळू महिलांना जिल्हा परिषदेचे पाठबळ : संग्रामसिंह देशमुख

कष्टाळू महिलांना जिल्हा परिषदेचे पाठबळ : संग्रामसिंह देशमुख

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हा परिषदेत सत्कार समारंभ, सॅनिटरी नॅपकिनसंदर्भातील अस्मिता योजनेस प्रारंभ

सांगली : धडपडणाºया कष्टाळू महिलांच्या पाठीशी जिल्हा परिषद कायम उभी राहील. शासनाच्या विविध योजना अशा महिलांपर्यंत पोहोचवून त्यांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केले.

जिल्हा परिषदेत कन्या कल्याण योजना, माझी कन्या भाग्यश्री, आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार, कायाकल्प कार्यक्रम पुरस्कार, तसेच सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका पुरस्कारांचे वितरण, तसेच शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त महिलांचा गौरव अध्यक्ष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर महिला बालकल्याण सभापती डॉ. सुषमा नायकवडी, आरोग्य सभापती तम्मनगौडा रवी, समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, लुल्ला चॅरिटेबल फौंडेशनच्या मुग्धा अभ्यंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अध्यक्ष देशमुख म्हणाले, महिलांच्या अडीअडचणी सोडविण्यासह त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. महिला बचत गटांची चळवळही सक्षमपणे चालत आहे. एका प्रदर्शनात महिलांच्या उत्पादनांना ३२ लाखांचे उत्पन्न मिळाले. म्हणजेच ही चळवळ योग्य दिशेने आणि गतीने चालू आहे. महिलांनी महिलांना सक्षम करण्याच्या या चळवळीबरोबरच आम्हीसुद्धा या भगिनींच्या प्रगतीच्या वाटांसाठी धडपडत राहू. त्यासाठी शासकीय योजनांबरोबरच जिल्हा परिषद स्तरावरही प्रयत्न होतील. सॅनेटरी नॅपकीनसाठी अंदाजपत्रकात आर्थिक तरतूद करणारी सांगली जिल्हा परिषद राज्यात एकमेव असेल, असेही त्यांनी सांगितले.

महिला बालकल्याण सभापती नायकवडी म्हणाल्या, स्त्रियांनी यशाच्या कक्षा रुंदावत अंतराळ क्षेत्रातही झेप घेतली. अनेक क्षेत्रांतील तिची गरुडभरारी सुरू असताना महिलांचा जन्मदर हा चिंतेचा विषय बनला आहे. सांगली जिल्ह्यात स्त्रियांच्या जन्म दरवाढीसाठी प्रभावीपणे चळवळ उभी राहिली आहे. त्याला यशही मिळत आहे. जन्मदर वाढून गुणोत्तर प्रमाणात समतोल साधला तर महिला दिनाचा एक मोठा उद्देश साध्य होईल. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, शिक्षण सभापती तम्मनगौडा रवी यांनीही मार्गदर्शन केले.

डॉ. राम हंकारे यांनी स्वागत व प्रास्तविक केले. कार्यक्रमास सदस्य डी. के. पाटील, चंद्रकांत पाटील, संभाजी कचरे, प्राजक्ता कोरे, आशाराणी पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे, प्रकल्प संचालक अजयकुमार माने यांच्यासह अधिकारी, आरोग्यसेविका, आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.

सर्वोत्कृष्ट आशा : स्वयंसेविका
भारती पाटील (बावची), शांता माने (वळसंग), आरोग्य सखी पुरस्कार-माधवी कांबळे (बावची), अर्चना बांगर (चिंचणी), सर्वोत्कृष्ट गटप्रवर्तक पहिले तीन क्रमांक अनुक्रमे- हेमा इम्मन्नवर (उमदी), प्रमिला साबळे (वळसंग), रूपाली महाडिक (मोहिते वडगाव).
 

कायाकल्प कार्यक्रम पुरस्कार -
प्रथम पुरस्कार प्राथमिक आरोग्य केंद्र बोरगाव (ता. वाळवा), तसेच उत्तेजनार्थ प्राथमिक आरोग्य केंद्र मांगले, दिघंची, चिंचणी, मांजर्डे, मणेराजुरी आणि कवलापूर.

डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार
२0१७-१८ प्रथम : उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर व प्राथमिक आरोग्य केंद्र आटपाडी, व्दितीय : प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचणी, तृतीय : प्राथमिक आरोग्य केंद्र कुंडल, उपकेंद्रामध्ये पहिले तीन क्रमांक अनुक्रमे-आरोग्य उपकेंद्र नागाव, उपकेंद्र कौठुळी, उपकेंद्र चोरोची.
२0१६-१७ चे पुरस्कार, प्रथम : ग्रामीण रुग्णालय कडेगाव व प्राथमिक आरोग्य केंद्र करगणी, व्दितीय : प्राथमिक आरोग्य केंद्र कवलापूर, तृतीय : प्राथमिक आरोग्य केंद्र कासेगाव, उपकेंद्रामध्ये पहिले तीन क्रमांक अनुक्रमे - उपकेंद्र नागेवाडी, उपकेंद्र कापुसखेड, उपकेंद्र बस्तवडे.

सॅनेटरी नॅपकीन वाटप...
महिला आणि अकरा ते एकोणीस वयोगटांतील किशोरवयीन मुलींमध्ये सॅनेटरी नॅपकीनचा वापर व वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात जाणीव जागृत करणाºया अस्मिता योजनेला महिला दिनादिवशी सुरुवात झाली. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने आयोजित केलेल्या अस्मिता योजनेचा शुभारंभ अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी डॉ. सुषमा नायकवडी, तम्मनगौडा रवि, समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, अभिजीत राऊत, डॉ. अंबादास सोनटक्के उपस्थित होते.

Web Title: Support of the Zilla Parishad for hardworking women: Sangram Singh Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.