दिव्यांगांना साथ देणे ही सामाजिक जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:21 AM2020-12-07T04:21:17+5:302020-12-07T04:21:17+5:30

इस्लामपूर : समाजातील दिव्यांग व्यक्तींच्या मागे उभे राहणे ही आपल्या सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे, त्यांच्या क्षमतेला आपल्या आधाराची साथ ...

Supporting the disabled is a social responsibility | दिव्यांगांना साथ देणे ही सामाजिक जबाबदारी

दिव्यांगांना साथ देणे ही सामाजिक जबाबदारी

Next

इस्लामपूर : समाजातील दिव्यांग व्यक्तींच्या मागे उभे राहणे ही आपल्या सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे, त्यांच्या क्षमतेला आपल्या आधाराची साथ दिली, तर त्यांचे भविष्य अधिक उज्ज्वल व्हायला वेळ लागणार नाही. म्हणूनच जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामबापू ज्ञानप्रबोधनीमार्फत दिव्यांग घटकांसाठी काम करत आहोत, असे प्रतिपादन प्रतीक पाटील यांनी केले.

जागतिक अपंग दिनानिमित्त वाळवा तालुका राष्ट्रवादी दिव्यांग सेल, जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियान व राष्ट्रीय अपंग विकास महासंघ यांच्यावतीने वाळवा पंचायत समिती येथे दिव्यांग पुरस्कार प्रदान सोहळा व दिव्यांग व्यक्तींना विविध साहित्याचे वाटप पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

पाटील म्हणाले, आगामी काळात समाजातील या दिव्यांग बांधवांना अधिक बळ देण्यासाठी जे सहकार्य करता येईल ते करण्याबाबत मी नेहमी सकारात्मक राहीन.

यावेळी सभापती शुभांगी पाटील, संजय पाटील, सुस्मिता जाधव, शहाजी पाटील, भूषण शहा, सहायक गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभार, डॉ. नरसिंह देशमुख, गोपाल नागे उपस्थित होते.

फोटो-

इस्लामपूर येथे पंचायत समितीमध्ये जागतिक दिव्यांग दिनानिमित्त प्रतीक पाटील यांच्याहस्ते साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी शुभांगी पाटील, सुस्मिता जाधव, संजय पाटील, शहाजी पाटील उपस्थित होते.

फाेटाे : ०६ इस्लामपुर ०३

Web Title: Supporting the disabled is a social responsibility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.