सूरज चौगुले यांना अमेरिकेतील विद्यापीठाची डी.लिट.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:27 AM2021-04-08T04:27:22+5:302021-04-08T04:27:22+5:30
इस्लामपूर : ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथील वारणा महाविद्यालयातील हिंदी विभागप्रमुख डॉ. सुरज बाळासाहेब चौगुले यांना सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ ...
इस्लामपूर : ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथील वारणा महाविद्यालयातील हिंदी विभागप्रमुख डॉ. सुरज बाळासाहेब चौगुले यांना सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका बॅबिलोना या विद्यापीठाची सामाजिक संशोधनात्मक व सांस्कृतिक कार्याबद्दल डी.लिट. ही पदवी बहाल करण्यात आली.
‘हिंदी, मराठी गझल’ या विषयावर त्यांचा संशोधनात्मक प्रबंध त्यांनी सादर केला. त्याचबरोबर सामाजिक कार्यामध्ये अनाथ मुलांच्या संदर्भातील त्यांचे कार्य आणि संशोधन कार्य, त्याचबरोबर सांस्कृतिक क्षेत्रातील ग्रंथालय चळवळ, राष्ट्रीय सेवा योजना अशा विविध क्षेत्रांत केलेल्या कार्याचा आढावा घेत त्यांना संशोधन आणि सामाजिक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट पदवी डी.लिट.ने सन्मानित करण्यात आले.
अमेरिकेतील बॅबिलोना स्टेटमधील सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका या विद्यापीठाकडून सामाजिक आणि संशोधनात्मक कार्य करणाऱ्या प्राध्यापकांसाठी ही पदवी दिली जाते. डॉ. सुरज चौगुले यांना देण्यात आलेली पश्चिम महाराष्ट्रातील ही पहिलीच पदवी आहे.
यापूर्वी डॉ. चौगुले यांना सामाजिक कार्यातील छत्रपती शाहू पुरस्कार, शिवाजी विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजनेचे उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार, शिक्षक संघटनेचा कृतिशील प्राध्यापक पुरस्कार, राज्य शासनाचा पर्यटन गौरव पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. सध्या ते अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा इस्लामपूरचे उपाध्यक्ष असून नाट्य क्षेत्रातील अभिनय व लेखनाची विविध पारितोषिके पटकावली आहेत. वारणा शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. प्रताप पाटील यांनी प्रा. चौगुले यांचे अभिनंदन केले.