जत लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी सुरेखा पतंगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:33 AM2021-06-09T04:33:26+5:302021-06-09T04:33:26+5:30
माडग्याळ : जत लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी सुरेखा पतंगे यांची तर लायनेसच्या अध्यक्षपदी द्राक्षायणी माळी यांची निवड करण्यात आली. ...
माडग्याळ : जत लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी सुरेखा पतंगे यांची तर लायनेसच्या अध्यक्षपदी द्राक्षायणी माळी यांची निवड करण्यात आली.
यावेळी लायन्स क्लबच्या उपाध्यक्षपदी दीपक हत्ती, सहदेव माळी यांची, सचिवपदी कविता आरळी तर खजिनदारपदी संगीता अरबळी यांची निवड करण्यात आली. या निवडी जत लायन्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष डाॅ. रवींद्र आरळी, माजी रिजन चेअरमन राजेंद्र आरळी, माजी झोन चेअरमन दिनकर पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. गेल्या २२ वर्षांपासून जत येथे लायन्सचे काम सुरू आहे. आगामी काळात महिलांसाठी विविध स्पर्धा, छोट्या अभ्यास सहली, आरोग्यविषयक शिबिरे, हळदी-कुंकू आदी कार्यक्रमाद्वारे चांगले काम करून दाखविण्याचा मानस असल्याचे नूतन अध्यक्ष सुरेखा पतंगे व द्राक्षायणी माळी यांनी सांगितले.