तुपारीच्या सरपंचपदी सुरेखा राक्षे; सुनील पाटील उपसरपंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:42 AM2021-02-23T04:42:27+5:302021-02-23T04:42:27+5:30
फाेटाे : २२ सुनील पाटील लोकमत न्यूज नेटवर्क बोरगाव : तुपारी (ता. पलुस) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी काँग्रेसच्या सुरेखा झनक राक्षे ...
फाेटाे : २२ सुनील पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरगाव : तुपारी (ता. पलुस) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी काँग्रेसच्या सुरेखा झनक राक्षे यांची तर उपसरपंचपदी सुनील पाेपट पाटील यांची निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. डी. महाडिक यांनी काम पाहिले.
तुपारी ग्रामपंचायतीमध्ये डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसप्रणित पॅनलने ८ जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवले तर अवघ्या एका जागेवर भारतीय जनता पक्षाला यश मिळाले होते. येथील सरपंचपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव होते. काँग्रेस व भाजपकडेही महिला ओबीसी सदस्य होते. त्यामुळे दोन्ही गटातून सरपंच पदासाठी दावा करण्यात आला होता. अखेर मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी सदस्यांमधून हात उंचावून मतदान घेण्यात आले. त्यात सुरेखा राक्षे यांना आठ मते मिळाल्याने त्यांची सरपंचपदी निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.
दरम्यान, निवडीनंतर नूतन सरपंच व उपसरपंचांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपसभापती संजय पाटील, माजी सरपंच दीपक पाटील, प्रकाश पाटील, पतंगराव पाटील, राजाराम पाटील, भानुदास पाटील, माणिक पाटील, बाबुराव पाटील, नितीन पाटील, मधुकर पाटील, बजरंग माने, राजाराम मरळे, भास्कर पाटील, सुकुमार पाटील, ब्रम्हा नलवडे, विष्णू नलवडे, महेश नलवडे, जगन्नाथ नलवडे व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. या निवडीनंतर गावातून ढोल- ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत सरपंच, उपसरपंच व नूतन सदस्यांची मिरवणूक काढण्यात आली.