सुरेश भोसलेंनी घेतली राजू शेट्टींची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:20 AM2021-06-05T04:20:28+5:302021-06-05T04:20:28+5:30

शिरटे : सहकार पॅनलचे प्रमुख तथा ‘कृष्णा’चे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार ...

Suresh Bhosale met Raju Shetty | सुरेश भोसलेंनी घेतली राजू शेट्टींची भेट

सुरेश भोसलेंनी घेतली राजू शेट्टींची भेट

Next

शिरटे : सहकार पॅनलचे प्रमुख तथा ‘कृष्णा’चे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांची भेट घेऊन पाठिंब्यासाठी विनंती केली. शेट्टी यांनी कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करून शुभेच्छा देतानाच यंदाच्या उर्वरित एफआरपीबाबत विचारणा केली असता डॉ. भोसले यांनी उर्वरित रक्कम लवकरच जमा करणार असल्याचे आश्वासन दिले.

जयसिंगपूर येथील शिवार कोविड सेंटर येथे डॉ. भोसले यांनी माजी खासदार शेट्टी यांची भेट घेऊन पाठिंबा देण्याची विनंती केली. या भेटीदरम्यान डॉ. भोसले यांनी कारखान्याच्या सहा वर्षांच्या कारकिर्दीत केलेल्या प्रगतीचा लेखाजोखा शेट्टी यांच्यासमोर मांडला. सहा वर्षांत सरासरी ३०५० रुपये एवढा उच्चांकी दर दिला आहे, डिस्टलरी युनिटमध्ये वाढ केली आहे, बोगस बाराशे कामगारांना काढून टाकले, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटशी करार करून कृष्णा शक्ती संजीवक तयार केले असल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले.

यावेळी पै. आनंदराव मोहिते, संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, कऱ्हाड दक्षिणचे अध्यक्ष रामचंद्र साळुंखे, विकास पाटील, सांगलीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, संजय बेले, प्रकाश देसाई, उपाध्यक्ष भागवत जाधव, रविकिरण माने, भास्कर मोरे, पंडित संकपाळ, तानाजीराव गावडे, विजय पाटील, देवेंद्र धस-पाटील आदी उपस्थित होते.

चौकट

कृष्णा कारखाना आर्थिक सुस्थितीत असून व्यवस्थित चालवल्याबद्दल डॉ. भोसले यांचे शेट्टी यांनी अभिनंदन केले. यावेळी भोसले यांनी ‘समृद्धीचा कृष्णा पॅटर्न’ ही पुस्तिका भेट दिली. त्यामधील कारखान्याचा लेखाजोखा शेट्टींनी वाचला आणि अशा प्रकारची कामे इतर कारखान्यांनी केली पाहिजेत, अशी भावना व्यक्त केली.

Web Title: Suresh Bhosale met Raju Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.