जागा बळकावण्याचा सुरेश खाडे यांचा प्रयत्न : काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 06:01 PM2017-10-06T18:01:03+5:302017-10-06T18:01:03+5:30

सुरेश खाडे यांनी आमदार पदाचा गैरवापर करून शैक्षणिक संस्थेच्या नावाखाली बळकावलेली मालगाव हद्दीतील कुष्ठरोगी वसाहतीसाठीची राखीव जागा शासनाने तातडीने ताब्यात घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यानी दिला आहे.

Suresh Khade attempts to grab space: Congress warns of agitation | जागा बळकावण्याचा सुरेश खाडे यांचा प्रयत्न : काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

जागा बळकावण्याचा सुरेश खाडे यांचा प्रयत्न : काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

Next

मिरज,दि.६  : सुरेश खाडे यांनी आमदार पदाचा गैरवापर करून शैक्षणिक संस्थेच्या नावाखाली बळकावलेली मालगाव हद्दीतील कुष्ठरोगी वसाहतीसाठीची राखीव जागा शासनाने तातडीने ताब्यात घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेस व राष्टÑवादीच्या पदाधिकाºयांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.


आ. खाडे यांनी मालगाव (ता. मिरज) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सुमारे ९ एकर गायरान जमिनीपैकी गट नं. २२४३ मधील जमीन शिक्षण संस्थेला मिळावी, यासाठी तत्कालीन ग्रामपंचायत सरपंच व स्थानिक नेत्यांना प्रलोभन दाखवून तसा ठराव करुन घेतला व शासनस्तरावर आमदारकीचे वजन वापरुन ही जागा संस्थेच्या नावावर करुन घेतली.

आ. खाडेंनी शासनासही चुकीची माहिती देऊन व दिशाभूल करून ही जागा हडप केली. सात-बारावर संस्थेचे नाव लावण्यात आले. शासनाने त्यांना दिलेली जागा वगळता उर्वरित शिल्लक जागेवर कुष्ठरोगी आशा धरून आहेत. तेथे त्यांच्या संस्थेच्या नावाचा बोर्ड लावला आहे.


यावेळी बाळासाहेब होनमोरे, अनिल आमटवणे, आप्पासाहेब हुळ्ळे, कृष्णदेव कांबळे, प्रशांत माळी आदी उपस्थित होते.


कारवाईपर्यंत लढा सुरूच : अनिल आमटवणे


मालगाव हद्दीतील सुमारे नऊ एकर संपूर्ण गायरान जागेला तारेचे कुंपण घालून आ. सुरेश खाडे यांनी कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आरक्षित असलेली जागा बळकावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

या आरक्षित जागेला अनधिकृत घातलेले कुंपण काढून ही जागा शासनाने ताब्यात घ्यावी, अशी आम्ही जिल्हाधिकाºयांकडे मागणी केली आहे. प्रशासनाने ही कारवाई करेपर्यंत आमचा लढा सुरूच ठेवणार असल्याचा इशारा पंचायत समितीचे माजी सभापती अनिल आमटवणे व बाळासाहेब होनमोरे यांनी दिला आहे.

 

Web Title: Suresh Khade attempts to grab space: Congress warns of agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.