पळपुट्यांचे अस्तित्व आता फार काळ टिकणार नाही!
By Admin | Published: June 7, 2017 12:22 AM2017-06-07T00:22:47+5:302017-06-07T00:22:47+5:30
पळपुट्यांचे अस्तित्व आता फार काळ टिकणार नाही!
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : आपण छत्रपतींचे नाव सांगतो आणि दोन-अडीच वर्षे सत्ता नाही, तर किती पळापळ सुरू केली आहे? तत्त्व व निष्ठेने वागणाऱ्यांचीच इतिहास गौरवपूर्ण नोंद ठेवत असतो. पळपुट्यांचे अस्तित्व फार काळ टिकणार नाही, अशा शब्दात माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडून जाणाऱ्यांचा समाचार घेतला.
नेर्ले (ता. वाळवा) येथील सदातात्या पाटील मळ्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला उभारण्यात आलेल्या आमदार जयंत पाटील स्वागत कमानीचे उद्घाटन, तसेच राज्य परिवहन मंडळातून सेवानिवृत्त झालेले सदाशिव पाटील यांचा सत्कार अशा संयुक्तिक कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ नेते, माजी मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर, राष्ट्रवादीचे कोल्हापूरचे माजी जिल्हाध्यक्ष के. पी़ पाटील, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी दिलीपराव पाटील, नगरसेविका सौ़ अर्चना पाटील, अतुल पाटील, प्रज्वल कदम यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जनार्दन पाटील, आप्पासाहेब माने, कऱ्हाडचे जगन्नाथ मोहिते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, सभापती सचिन हुलवान, उपसभापती नेताजीराव पाटील, जि़ प़ सदस्या सौ़ संगीता पाटील, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, संचालक आनंदराव पाटील, आप्पासाहेब कदम, जयसिंग पाटील, ग्रंथपाल संघटनेचे राजेंद्र पाटील, सुरेश पाटील, जालिंदर पाटील उपस्थित होते.
के़ एस़ पाटील यांनी स्वागत केले, ए़ टी़ पाटील यांनी प्रास्ताविक केले़ विजय लोहार यांनी सूत्रसंचालन केले़ शिवराज पाटील यांनी आभार मानले.
हा माझा वडीलकीचा सल्ला...
विलासकाका पाटील म्हणाले की, वैचारिक पाया खचल्यामुळेच काँग्रेस व राष्ट्रवादीवाल्यांची मुले भाजपकडे पळत सुटली आहेत़ यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील यांनी राज्यात एका बाजूला रचनात्मक काम करून लोकांचे जीवन समृध्द करतानाच, दुसऱ्या बाजूला बौध्दिक शिबिरे घेऊन कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली़ पुन्हा एकदा बौध्दिक शिबिरांच्या माध्यमातून कार्यकर्ता घडविण्याचे काम आपणाला सुरू करावे लागेल. जयंतरावांनी हे काम हाती घ्यावे, हा माझा वडीलकीचा सल्ला आहे़