‘सूर्यराज’ तापले, ‘सर्पराज’ खवळले! चौघांचा बळी : जिल्ह्यात साडेचारशे जणांना सर्पदंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 12:48 AM2018-06-06T00:48:34+5:302018-06-06T00:48:34+5:30

'Suryaraj' hot, 'Saprajaraj' blossomed! Fourth victim: Snake bite to 450 people in the district | ‘सूर्यराज’ तापले, ‘सर्पराज’ खवळले! चौघांचा बळी : जिल्ह्यात साडेचारशे जणांना सर्पदंश

‘सूर्यराज’ तापले, ‘सर्पराज’ खवळले! चौघांचा बळी : जिल्ह्यात साडेचारशे जणांना सर्पदंश

Next

सचिन लाड ।
सांगली : वातावरणातील बदल, तसेच उन्हाच्या तडाख्यामुळे सर्वत्र ‘सर्पराज’ चांगलेच खवळले आहेत. त्यांचे वारुळ उन्हामुळे प्रचंड तापत असल्याने सर्प गारवा शोधण्याच्या प्रयत्नात आजुबाजूच्या घरात आश्रयाला जात आहेत. मानवी वस्तीत राहण्याची सवय नसल्याने त्यांच्याकडून दंश होण्याच्या घटनांत वाढ होत आहे. गेल्या तीन महिन्यात जिल्ह्यात ४३० जणांना सर्पदंश झाल्याची नोंद आहे. यामध्ये चौघांचा बळीही गेला आहे.

सांगली व मिरजेतील शासकीय रुग्णालयात सर्पदंशाचे दररोज सहा ते सात रुग्ण दाखल होत आहेत. गेल्या आठ दिवसात हा आकडा वाढला आहे. सर्पदंश झालेल्या रुग्णास उपचारार्थ तातडीने रुग्णालयात दाखल केले जाते. डॉक्टर प्रथम त्या रुग्णास अतिदक्षता विभागात हलवितात. विषारी आणि बिनविषारी असे सर्प असतात. रुग्णास कोणता सर्पदंश झाला आहे, हे कोणालाच समजत नाही.

काही वेळेला डॉक्टरांना उपचारासाठी मदत मिळावी, यासाठी संबंधित रुग्णास जो सर्प चावला आहे, त्याला पकडून रुग्णासह डॉक्टरांकडे घेऊन येतात. या प्रकाराने डॉक्टरही घाबरुन जातात. त्यांना सर्प कोणत्या जातीचा आहे, हे समजत नाही. सर्पदंश झालेल्या रुग्णावर चार-पाच तास देखरेख ठेवली जाते. यादरम्यान त्याच्या प्रकृतीने उपचारास प्रतिसाद दिला, तर धोका टळला असल्याचे मानले जाते.

यावर्षी प्रचंड उन्हाळा जाणवला. हवामानात सतत बदल होत आहे. उन्हाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाले. पण उन्हाचा तडाखा, गारव्याच्या शोधार्थ आणि उन्हाळी पावसाच्या ओलाव्यामुळे सर्प स्वत:चा जीव वाचविण्यासाठी वारुळातील बिळातून बाहेर पडले. आश्रयासाठी ते मानवी वस्तीत शिरत होते. घरातील दिवळीत, तुळीवर, पोटमाळ्यावर, उखळामध्ये, धान्याच्या पोत्याच्या ढिगाऱ्यात, कॉट तसेच तिजोरी यासह मिळेल त्या अडगळीच्या ठिकाणी जाऊन ते बसल्यामुळे, घरातील व्यक्ती त्याठिकाणी कामानिमित्त गेल्यानंतर सर्पराजांनी त्यांना दंश केल्याच्या घटना घडल्या.

अनेकदा रुग्णास कुणाचा दंश झाला आहे, हे समजत नाही. अज्ञात विषारी दंशाच्या संशयानेच त्याच्यावर उपचार केले जातात. गेल्या तीन महिन्यात शासकीय रुग्णालयात खासगी रुग्णालयात सर्पदंशाने उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांची संख्या साडेचारशेपर्यंत गेली आहे. दिवसेंदिवस हा आकडा वाढतच आहे.

उपचाराचा खर्च महागडा
सर्पदंश झालेल्या रुग्णाची वैद्यकीय अधिकाºयाकडून पोलीस केस बनविली जाते. त्यामुळे या रुग्णावर मोफत उपचार केले जात आहेत. केस झाल्यामुळे पोलीस रुग्णाचा जबाब नोंदवून घेतात. त्याने सर्पदंशच झाल्याचे सांगितले, तर केस फाईलबंद केली जाते. रुग्णावरील या उपचाराचा खर्चही महागडा आहे. खासगी रुग्णालयात रुग्ण दाखल झाला, तर किमान पंधरा ते सतरा हजार रुपये खर्च येतो, असे डॉक्टरांनी सांगितले.

Web Title: 'Suryaraj' hot, 'Saprajaraj' blossomed! Fourth victim: Snake bite to 450 people in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.