Sangli Crime: विनयभंगप्रकरणी बोरगावच्या निलंबित उपनिरीक्षकास अटक, पीडितीने फिर्याद दिल्यापासून होता फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 05:03 PM2023-03-04T17:03:43+5:302023-03-04T17:04:05+5:30
मोबाईलवर व्हिडिओ संपर्क करताना स्वत: विवस्त्र होऊन पीडित मुलीकडेही अशीच मागणी करत
इस्लामपूर : पंचवीस वर्षे वयाच्या विवाहितेचा तिच्या वयाच्या अकराव्या वर्षापासून सलग चौदा वर्षे विनयभंग करत राहिलेल्या मुंबई पोलिस दलातील निलंबित पोलिस उपनिरीक्षकास येथील न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी दिली. शंकर जयवंत पाटणकर (वय ३२, रा. बोरगाव, ता. वाळवा) असे या संशयिताचे नाव आहे.
पीडित विवाहितेने १५ दिवसांपूर्वी पाटणकर याच्याविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली होती. तेव्हापासून शंकर पाटणकर हा फरारी होता. पोलिसांनी गुरुवारी त्याला अटक केली. जानेवारी २००९ ते फेब्रुवारी २०२३ अशा चौदा वर्षांच्या कालावधीत पाटणकर याने पीडितेचा मानसिक छळ केला होता.
तू मला आवडतेस, माझ्याशी लग्न कर असे म्हणत पाटणकर हा अश्लील हावभाव करत तिचा विनयभंग करत होता. तसेच मोबाईलवर व्हिडिओ संपर्क करताना स्वत: विवस्त्र होऊन पीडित मुलीकडेही अशीच मागणी करत होता. दुचाकी आणि चारचाकी वाहनातून तिचा पाठलाग करणे, रस्त्यात अडवून हात धरून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन पाटणकर करत होता. तपास सहायक निरीक्षक अरविंद काटे करत आहेत.