तासगावात मोडकळीस आलेल्या बसच्या वापराप्रकरणी तिघे निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 10:12 PM2019-11-15T22:12:23+5:302019-11-15T22:13:07+5:30

लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी बस सुस्थितीत असणे आवश्यक होते. मात्र त्यावेळी मुंंबईला जाणाºया बसची अवस्था धोकादायक होती. त्यामुळे लांब पल्ल्यासाठी चांगल्या बसचा वापर करावा, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली होती. मात्र या मागणीची दखल घेतली नाही.

 Suspended for use of broken bus in Las Vegas | तासगावात मोडकळीस आलेल्या बसच्या वापराप्रकरणी तिघे निलंबित

तासगावात मोडकळीस आलेल्या बसच्या वापराप्रकरणी तिघे निलंबित

googlenewsNext
ठळक मुद्देआगार व्यवस्थापकांची कारवाई : प्रवाशांच्या लेखी तक्रारीची दखल

तासगाव : मोडकळीस आलेल्या बसचा वापर तासगाव ते मुंबई या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी करण्यात आला होता. याबाबत डोंगरसोनी (ता. तासगाव) येथील अभिजित झांबरे यांनी तक्रार केली होती. त्याची दखल घेत आगार व्यवस्थापकांनी याप्रकरणी दोषी आढळणाऱ्या प्रमुख कारागीर, वाहन परीक्षक आणि कारागीर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

दिवाळी सुटी संपल्यानंतर तासगाव आगारातून अभिजित झांबरे मुंबईला जाण्यासाठी निघाले होते.

लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी बस सुस्थितीत असणे आवश्यक होते. मात्र त्यावेळी मुंंबईला जाणाºया बसची अवस्था धोकादायक होती. त्यामुळे लांब पल्ल्यासाठी चांगल्या बसचा वापर करावा, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली होती. मात्र या मागणीची दखल घेतली नाही. त्यानंतर झांबरे यांनी स्थानकात तक्रार नोंदवहीत लेखी तक्रार दाखल केली. मुंबईला जाण्यासाठी अन्य कोणता पर्याय नसल्याने प्रवाशांनी जीव मुठीत घेऊनच मुंबईचा प्रवास केला.

झांबरे यांच्या लेखी तक्रारीची तासगावच्या आगार व्यवस्थापकांनी गंभीर देखल घेतली. या प्रकरणाबाबत कारवाई करण्याचे लेखी आश्वासनही दिले. त्यानुसार आगार व्यवस्थापक सी. बी. पाटील यांनी मोडकळीस आलेली बस लांब पल्ल्यासाठी वापरात आणण्यास जबाबदार असणाºया तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली.

सुरळीत नियोजनाची अपेक्षा
आगार व्यवस्थापकांनी प्रवाशांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत कारवाईचे पाऊल उचलले. मात्र तासगाव आगारात अनेक बसेसची अवस्था दयनीय आहे. बसचे वेळापत्रक नेहमीच कोलमडलेले असते. बस फेºयांचे नियोजन प्रवाशांच्या गरजेनुसार होत नाही. त्यामुळे अनेकदा बसेस मोकळ्या जातात, तर अनेकदा बसमधून जाण्यासाठी झुंबड उडते. त्यामुळे आगार व्यवस्थापकांकडून सुरळीत नियोजनासाठीदेखील कारवाईचे पाऊल उचलावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

Web Title:  Suspended for use of broken bus in Las Vegas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.